समाधान कांबळे
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर काय होऊ शकते हे हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोनवाडा या अतिदुर्गम भागातील तरुणानं दाखवून दिलं आहे. अकरावी शिकणाऱ्या मारुती कोरुडे या 17 वर्षीय विद्यार्थ्याने ई बाईक तयार केली आहे. कमी खर्चात चार्जिंग वर चालणारी ही ई बाईक आहे. शेतातील आखाड्यावरच भंगारातील जुन्या स्कुटी आणि दुचाकीचे साहित्य वापरून त्याने ही बाईक तयार केली. तो सैनिक शाळेत शिकतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लहानपणापासूनच मारुती कुरूडे या विद्यार्थ्याला विविध प्रयोग करण्याचा छंद आहे. त्यातूनच त्याने ई बाईक बनवण्याचा निर्णय घेतला होता. पण टाकावू पासून टीकावू करण्याचा त्यांना मानस होता. ही ई बाईक तयार करताना त्याने भंगारातील जुन्या वस्तूंचा वापर करण्याचा ठरवला. भंगारातील जुन्या दुचाकीचे टायर, लोखंडी अँगल, त्याचबरोबर 12 होल्टेजच्या चार बॅटरी यासाठी त्याने वापर केला.
ट्रेंडिंग बातमी - India Alliance: इंडिया आघाडीत खरोखर फूट पडली आहे का? पडद्यामागे काय घडतंय?
या सर्व साहित्याच्या सहाय्याने त्यांनी ही बाईक तयार केली आहे. या ई बाईकमध्ये वापरात येणाऱ्या चार बॅटऱ्यांपैकी दोन बॅटऱ्यांवर बाईक चालते. तर उर्वरित दोन बॅटरी ऑटोमॅटिक चार्जिंगसाठी वापरली जाते. ही ई बाईक एकदा चार्जिंग केल्यानंतर 45 किलोमीटरच्या वेगाने धावते. शिवेय जवळपास 60 किलोमीटरचं अॅव्हरेज सुद्ध ही बाईक देते. शेतातील आखाड्यावर सहा ते सात दिवसात ही ई बाईक मारुती कुरुडे यानं बनवली.
मारुतीचं वय अवघं सतरा वर्षाचं आहे. तो सैनिक शाळेत शिकतो. नवनवे प्रयोग करण्याचा त्याचा छंद आहे. त्यातून त्याने आतापर्यंत वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्याने ई बाईक केल्यानंतर त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. त्याला भविष्यात शास्त्रज्ञ होण्याची इच्छा आहे. गावाचं आणि देशाचं नाव मोठं करण्याचा त्याचा मानस आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असल्याचेही त्याने सांगितले. दरम्यान ही ई बाईक सर्व सामान्याच्या फायद्याची ठरेल असंही तो म्हणतो.