वयाची 80 पार, तरही कामगिरी दमदार! जयंती काळे आजी तुम्हाला माहित आहेत का?

आजीबाई फक्त नावाला स्विमिंग करत नाहीत तर त्या राउंड स्ट्रोक, साईड स्ट्रोक, बॅक स्ट्रोक हे स्विमिंगचे प्रकारही उत्तमपणे करतात.

Advertisement
Read Time: 2 mins
नाशिक:

प्रांजल कुलकर्णी

नवरात्रोत्सव काळात देवीचा जागर करण्यासोबतच अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या महिलांचाही सन्मान केला जातो. मात्र आता आम्ही तुम्हाला अशा एका आजीबाईंची भेट घडवून देणार आहोत, ज्या आजींची जिद्द आणि इच्छाशक्ती ही थक्क करणारी आहे. त्यांचे नाव आहे जयंती काळे. त्यांना पोहण्याची आवड आहे. त्यांचे वय 80 वर्षे आहे. या वयातही त्या ज्या जिद्दीने आणि चपळाईने पोहोतात ते पाहून सर्वच जण थक्क झाले आहेत.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

जयंती काळे या नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहता. रोज सकाळी नऊ वाजता साडी, डोक्यावर पदर, कपाळावर टिकली या पेहरावात त्या घराबाहेर पडतात. तिथून त्या त्र्यंबक रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव परिसरात पोहोचताच. आजीबाई स्विमिंग सुट घालतात. त्यानंतर 18 फूट तलावात असा काही सूर मारतात जो भल्या भल्या स्वीमरलाही जमत नाही. आजीबाई फक्त नावाला स्विमिंग करत नाहीत तर त्या राउंड स्ट्रोक, साईड स्ट्रोक, बॅक स्ट्रोक हे स्विमिंगचे प्रकारही उत्तमपणे करतात. दुसरीत असताना त्यांना पोहण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्या विहीर, तलाव, नदीत पोहत असत. जसं वय वाढत गेलं तशी ही आवड अजून वाढत गेली. शिवाय पोहण्यातही त्या मास्टर झाल्या. 

ट्रेंडिंग बातमी - 9 महिन्याचा चिमुकला, गळ्याला साप चावला, 20 दिवस बेशुद्ध, नंतर जे झालं ते...

यात त्यांना उत्तम साथ मिळते ती म्हणजे त्यांच्या कोच आणि मैत्रिणींची.जयंती आजी म्हणजे आमच्यासाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी उदाहरण असल्याचं त्यांचं त्यांच्या कोच शिल्पा सुभेदार पाटील सांगतात. आजी शाळेत होत्या तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये स्विमिंगची गोड निर्माण झाली होती. पाणी दिसलं की माझे हातपाय आपोआप लटपट करायला लागतात असं आजी सांगतात. लग्नानंतर त्यांनी एकदा विहिरीत पोहण्यासाठी उडी मारली होती. तेव्हा सासरचे सगळे घाबरले होते, त्यांना कोणालाही त्या पोहतात हे माहित नव्हते ही आठवण त्या आवर्जून सांगतात. 

ट्रेंडिंग बातमी - डोंबिवलीत ट्वीस्ट! शिंदेंचा मोहरा ठाकरेंच्या गळाला, भाजपचे टेन्शन वाढले?

अगदी शालेय जीवनापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत आजींनी आजवर अनेक पारितोषिके पटकावली आहेत. गोवा, मालवणच्या समुद्रातही त्यांनी सूर मारले आहेत. कर्नाटक, पंजाब अशा राज्यांमध्ये जाऊन आजींनी मेडल्स मिळवले आहेत. राष्ट्रीय पातळीवर देखील त्यांनी अनेक गोल्ड मेडल आपल्या पदरी पाडली आहेत. स्विमिंगचे महत्व पटवून देत आजींनी अगदी आपल्या सुना मुली यांना देखील स्विमिंग शिकवले आहे.

ट्रेंडींग बातमी - निर्दयी बाप! दोन चिमुकल्या मुलींचा आधी खून केल मग नदीत फेकले

पती, तिन मुले, तिन सुना, दोन मुली, चार नातवंड असा आजीबाईंचा परिवार आहे. वयाच्या साठी नंतर खरं तर अनेक जण आपलं पुढील आयुष्य रमत गंमत, नातवंडांच्या सान्निध्यात घालवतात.  निरोगी आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात. मात्र जयंती काळे या आजी त्याला अपवाद आहेत. जस जस वय वाढतंय तसतसं आजी आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहेत.