अमोल गावंडे
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा नजीक असलेल्या लोणी कादमापूर येथे एक हृदय पिळविणारी घटना उघडकीस आली आहे. निर्दयी बापानेच आपल्या दोन मुलींना संपवलं. त्यानंतर त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिले. या संपूर्ण घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. त्यातील एक मुलगी ही सात वर्षाची आहे. तिचं नाव सदफ आहे तर दुसरी मुलगी ही नऊ वर्षाची असून तिचं नाव आलिया असं आहे. या दोघींचा खून करून त्यांचे मृतदेह बाळापूर अकोला येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मन नदीमध्ये फेकण्यात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
कदमापूर येथील शेख हारून शेख शब्बीर यांनी दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. गायब होण्या आधी दोन्ही मुलींना अटाळी येथून ऑटो रिक्षात बसून दिले होते असे सांगितले होते. मात्र पोलिसांना शेख हारून यावर शंका आली. तो ज्या पद्धतीने घटना सांगत होता त्यावरून काही तरी चुकीचं घडलं असल्याचं पोलिसांना वाटलं. अखेर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला. त्याला उलट सुलट प्रश्न विचारले गेले. त्यात तो गडबडला आणि सर्व प्रकार समोर आला. आरोपी हा तणावाखाली होता. शिवाय त्याला चार मुली आहेत. त्याती खून केलेल्या मुली मोठ्या होत्या. रागाच्या भरात त्यांनी त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे.
ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE : शिवस्मारकावरून संभाजी राजे आक्रमक, शिवस्मारक शोधण्याचे आंदोलन छेडले
पोलिसांच्या चौकशीत त्याने आपल्या मुलींचा खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने दाखविलेल्या बाळापूर येथील बायपासवरील नदीमध्ये दोन्ही मुलींचा मृत्यू शोधण्यासाठी खामगाव ग्रामीण,हिवरखेड व अकोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अकोल्याच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने त्यांचे मृतदेह शोधून काढले आहेत. बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या पथकाने भिकुंड नदीतून अथक परिश्रमानंतर शनिवारी रात्री बारा नंतर, रेस्क्यूबोटीने सर्च ऑपरेशन करून बुलढाण्यातील दोन्ही बहिणीचा मृतदेह शोधून काढला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world