जाहिरात

Israel- Iran Strikes: 'आमच्या हॉटेल शेजारी स्फोट', सांगली, वाशिमचे पर्यटक दुबईत अडकले; भयावह स्थिती सांगितली

हॉटेलच्या परिसरातील काही अंतरावर स्फोटाचे आवाज ऐकू येत असल्याने भारत सरकारने आमची सुटका करावी,अशी मागणी या सर्व पर्यटकांकडून आता करण्यात येत आहे.

Israel- Iran Strikes: 'आमच्या हॉटेल शेजारी स्फोट', सांगली, वाशिमचे पर्यटक दुबईत अडकले; भयावह स्थिती सांगितली

साजन दाबे, वाशिम:

Maharashtra Tourist Stuck in Dubai: अमेरिका- इस्त्राईल आणि इराणमध्ये युद्धाचा वणवा पेटला आहे. इराण-इस्रायल अमेरिका यांच्यातील वाढलेल्या संघर्षाचा फटका परदेशात गेलेल्या भारतीयांना बसला आहे. या युद्धामूळे वाशिमच्या रिसोड मधील चार पर्यटक दुबईत अडकले असून आमच्या हॉटेलच्या शेजारी मेट्रो स्टेशन वर स्फ़ोट झाला त्यामुळं आमची चिंता वाढलीये. आम्हाला लवकर मायदेशी घेऊन जा अशी आर्त हाक या पर्यटकांनी सरकारला दिली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, रिसोड येथील भगवान निर्बान, त्यांची पत्नी पदमाबाई निर्बान, मुलगा पवन निर्बान आणि सून नंदा निर्बान हे २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथून दुबईला पर्यटनासाठी गेले होते. पाच दिवसांचा दौरा पूर्ण करून २८ फेब्रुवारी रोजी अबू धाबी येथून पुण्याकडे परतण्याचे त्यांचे तिकीट आरक्षित होते.

मात्र अचानक निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे विमानतळावरील उड्डाण सेवा स्थगित करण्यात आली आणि त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे. रिसोड येथील निर्बान कुटुंबीय  वृद्ध आई वडील, भाऊ वाहिनी दुबईत अडकल्यामुळं चिंतेत असून लवकरात लवकर भारतात आणण्याची विनंती त्यांनी सरकारला केली आहे. 

Israel Iran war: महाराष्ट्रातील बडा नेता दुबईत अडकला! युद्धाचा फटका; परतीचे मार्ग बंद

सांगलीमधील 30 पर्यटक अडकले! 

 या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबई या ठिकाणी सांगलीच्या कुपवाड येथील 30 पर्यटक अडकले आहेत. पर्यटनासाठी 30 जणांचा ग्रुप हा दुबई मध्ये गेला होता, मात्र इराण इजराइल युद्धामुळे विमानसेवा बंद झाल्याने सर्व पर्यटक आता दुबईमध्येच अडकले असून ते सर्वजण सध्या सुखरूप आहेत.एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून कुपवाड येथील हे सर्व पर्यटक दुबईमध्ये फिरण्यासाठी गेले होते युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते दुबईतच अडकले आहेत. हॉटेलच्या परिसरातील काही अंतरावर स्फोटाचे आवाज ऐकू येत असल्याने भारत सरकारने आमची सुटका करावी,अशी मागणी या सर्व पर्यटकांकडून आता करण्यात येत आहे.

जळगावमधील 31 जण दुबईत

त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील 31जण दुबई मध्ये अडकले असून एका विमा कंपनीच्या कार्यक्रमानिमित्त हे 31 दुबईमध्ये गेले होते. व 2 मार्च रोजी केलेले सर्व परत येणार होते मात्र अमेरिका इजराइल व इराण युद्धामुळे दुबईतील हवाई वाहतूक बंद करण्यात आल्याने हे सर्व 31 जण अडकले असून अडकलेल्या लोकांच्या नातेवाईकांची चिंता मात्र वाढली आहे.

पुण्यातील विद्यार्थीही अडकले

दुबईमध्ये शैक्षणिक सहलीसाठी गेलेली हिंगोलीची खुशी बडोरा हे तरुणी युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत अडकली आहे.. पुणे येथे एका इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण येणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दुबईला गेली होती. ही सहल एक मार्च रोजी मुंबई मार्गे पुण्याला परतणार होती मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा विस्कळीत झाली आणि हिंगोलीची ख़ुशी आणि तिच्यासोबतचे 19 विद्यार्थी दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकले आहेत. दरम्यान खुशी दुबईला अडकल्याचं कळतच कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला होता मात्र महाविद्यालयाने सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Crime News: नाशिक हादरलं! विवाहितेचा 2 लाखांत 'सौदा'; इव्हेंटच्या नावाखाली नेलं अन् पुढे भयंकर घडलं

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com