'...म्हणून आयटी इंजिनिअर आमदारकी लढवणार', चिंचवडमधील 'या' उमेदवाराची चर्चा

दीड लाखांपेक्षा अधिक आयटी मतदार असताना ही आजपर्यंत हिंजवडीची अभूतपूर्व वाहतूक कोंडी, पाणी आणि कचरा या तीन मूलभूत गरजा ही पूर्ण करू शकलेला नाही. म्हणूनचं सचिन सिद्धे या घटकाचा आवाज विधानसभेत उठवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

जाहिरात
Read Time: 4 mins

सूरज कसबे, प्रतिनिधी: राज्याच्या राजकारणात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. अनेक दिग्गजांनी आमदारकी मिळवण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आयटी इंजिनिअर सचिन सिद्धे ही उतरला आहे. दीड लाखांपेक्षा अधिक आयटी मतदार असताना ही आजपर्यंत हिंजवडीची अभूतपूर्व वाहतूक कोंडी, पाणी आणि कचरा या तीन मूलभूत गरजा ही पूर्ण करू शकलेला नाही. म्हणूनचं सचिन सिद्धे या घटकाचा आवाज विधानसभेत उठवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

आजवर चिंचवडमध्ये निवडून आलेल्या आमदाराला दीड लाखाच्या आसपासचं मत मिळालीत, हे पाहता इथल्या दिड लाख आयटी मतदारांनी ठरवलं तर सचिन सिद्धे हे आयटीवाल्यांचे आमदार ही होऊ शकतात. पण एसीत बसून काम करणारे आयटीवाले बाहेर डोकावून त्यांच्यासाठी झगडणाऱ्या सचिन सिद्धे कडे पाहणार का? त्याच्यावर विश्वास दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे. सचिन सिद्धे हे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांना एसी एअर कंडिशनर हे निवडणूक चिन्ह देखील मिळाले आहे. सचिन सिध्दे हे पिंपरी चिंचवड शहरात कुटुंबासह राहतात, आणि त्यांनी एमसीएस पदवी प्राप्त केली असून त्यांना ४ वर्षांचा आंतरराष्ट्रीय आयटी अनुभव आहे आणि १६ वर्षांचा नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आयटी अनुभव आहे. गेल्या ८ वर्षांपासून ते नॅनो होम्स को-ऑप हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष म्हणून सेवा देत आहेत.

Advertisement

या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधी सचिन सिद्धे यांनी आपला जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्यांनी महिला वर्ग, तरुण, तरुणी, आयटी क्षेत्रातील नोकरदारांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा आणि आश्वासने दिली आहेत. तसेच शहराचे सुशोभीकरण, वाहतूक व्यवस्थापन, रस्ते, स्वच्छता व्यवस्थापन यांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. 

Advertisement

नक्की वाचा: 'शरद पवार माफी मागा', अजित पवारांच्या आमदाराने थेट नोटीस धाडली

असा आहे जाहीरनामा!

खड्डेमुक्त रस्ते: नियमित देखभाल, त्वरित दुरुस्ती, आणि टिकाऊ बांधकाम पद्धतींचा अवलंब करून सुरक्षित रस्त्यांची हमी.

करांचा प्रभावी वापर:  मूलभूत सुविधा, सामाजिक सेवा आणि नागरिकांना फायदेशीर असणाऱ्या समुदाय प्रकल्पांसाठी कर महसुलाचा पारदर्शक वापर.

विश्वसनीय पाणीपुरवठा: सुधारित पायाभूत सुविधा, गळती दुरुस्ती, पावसाचे पाणी साठवणे आणि प्रत्येक घरासाठी शाश्वत पाणी योजना.

सततचा वीज पुरवठा: वीज ग्रीड मजबूत करणे, बॅकअप पॉवर सिस्टीम्स, आणि स्मार्ट मीटर्स बसवणे जेणेकरून वीजपुरवठा खंडित होणार नाही.

स्वच्छता व्यवस्थापन: स्वच्छता सुधारण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी मलनिस्सारण प्रणाली आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे नूतनीकरण.

सुशोभिकरण: शहराचे सौंदर्यीकरण, सार्वजनिक उद्याने, हरित क्षेत्रे, आणि स्वच्छ, अधिक राहण्यायोग्य वातावरणासाठी चांगली रस्त्यावरील प्रकाशव्यवस्था.

वाहतूक व्यवस्थापन: सुधारित रस्ता नेटवर्क, स्मार्ट वाहतूक सिग्नल आणि गर्दी कमी करण्यासाठी चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था.

स्वतंत्र बाजार आणि खेळाची मैदाने: ताज्या फळ-भाज्यांसाठी स्वतंत्र विक्री स्थळे आणि मुलांच्या मनोरंजनासाठी सुरक्षित, सुलभ मैदाने.

सक्रिय आमदार निधी वापर: सौर ऊर्जा, पेव्हिंग ब्लॉक्स, आणि स्मार्ट गव्हर्नन्स यांसारख्या शासकीय योजनांचा प्रभावी अंमलबजावणी.

जॉगिंग ट्रॅक आणि नदीकिनारी सौंदर्यीकरण: सुरक्षित चालण्याचे, सायकल चालवण्याचे मार्ग आणि नदीकिनारी मनोरंजनाची ठिकाणे विकसित करणे.

रोजगार निर्मिती: स्थानिक उद्योगांना चालना देणे, गुंतवणूक आकर्षित करणे, आणि रोजगार संधींसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी.

तरुणांसाठी व्यावसायिक शिक्षण: चांगल्या करिअर संधींसाठी आवश्यक व्यवसायांमध्ये प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे आणि अभ्यासक्रम उपलब्ध करणे.

स्मार्ट गव्हर्नन्स स्मार्ट सिटीसाठी: जातीयवाद, धर्मवाद आणि प्रांतीयवाद दूर करून एकता, समता, आणि सर्वसमावेशक प्रशासनाला चालना देऊन सामाजिक प्रगती व सौहार्द साधणे. तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, डेटा-आधारित निर्णय घेणे, नागरिकांचा सहभाग, आणि शाश्वत नागरी विकासासाठी कार्यक्षम सेवा वितरण.

Advertisement

सक्रिय आमदार निधी वापर: सौर ऊर्जा, पेव्हिंग ब्लॉक्स, आणि स्मार्ट गव्हर्नन्स यांसारख्या शासकीय योजनांचा प्रभावी अंमलबजावणी.

जॉगिंग ट्रॅक आणि नदीकिनारी सौंदर्यीकरण: सुरक्षित चालण्याचे, सायकल चालवण्याचे मार्ग आणि नदीकिनारी मनोरंजनाची ठिकाणे विकसित करणे.

रोजगार निर्मिती: स्थानिक उद्योगांना चालना देणे, गुंतवणूक आकर्षित करणे, आणि रोजगार संधींसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी. तरुणांसाठी व्यावसायिक शिक्षण: चांगल्या करिअर संधींसाठी आवश्यक व्यवसायांमध्ये प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे आणि अभ्यासक्रम उपलब्ध करणे. स्मार्ट गव्हर्नन्स स्मार्ट सिटीसाठी जातीयवाद, धर्मवाद आणि प्रांतीयवाद दूर करून एकता, समता, आणि सर्वसमावेशक प्रशासनाला चालना देऊन सामाजिक प्रगती व सौहार्द साधणे.

 दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता निवडून येणाऱ्या उमेदवाराला दीड लाखांपर्यंत मते पडतात, या चिंचवड मतदार संघात दीड लाख आयटी इंजिनियर हे मतदार आहेत त्यांनी जर ठरवलं तर सचिन शिंदे हे आमदार होऊ शकतात पण एसीत बसून काम करणारे आयटी वाले बाहेर डोकावून त्यांच्यासाठी जगणाऱ्या सचिन सिद्धे यांना साथ देणार का त्यांच्यावरती विश्वास दाखवून त्यांना मतदान करणार का हे पाहणे देखील महत्त्वाच असणार आहे.

ट्रेंडिंग बातमी: भरारी पथकावर खंडणीचा गुन्हा, उल्हासनगर महापालिकेच्या 3 कर्मचाऱ्यांसह 2 पोलिसांविरोधात गुन्हा