मंगेश जोशी, जळगाव: जळगावमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जळगावमधील अल्पवयीन मुलीला कामाच्या बहाण्याने नाशिकला घेऊन जात तिची कोल्हापूरमध्ये विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देत तिचा गर्भपात करण्यात आला. या भयंकर घटनेने धक्का बसलेल्या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या बातमीने जळगाव जिल्हा हादरुन गेला आहे.
Panvel News: 'माफ करा, दुसरा पर्याय नव्हता..' चिठ्ठी लिहून नवजात बाळाला फुटपाथवर सोडलं, आरोपींना अटक
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कामाच्या बहाण्याने दोन महिलांनी जळगावमधील अल्पवयीन मुलीला नाशिक येथे घेऊन जात तिची दोन लाखांमध्ये विक्री केल्याची संतापजनक घटना घडली. एवढेच नाही तर या महिलांकडून तिचा गर्भपातही करण्यात आल्याची माहिती मुलीने घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना दिली आहे. मुलीला विकल्याच्या धक्क्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली असून सदर घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे
एवढेच नाही तर या महिलांकडून तिचा गर्भपातही करण्यात आल्याची माहिती मुलीने घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना दिली आहे. मात्र मुलीला विकल्याच्या धक्क्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली असून सदर घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.
Kalyan : APMC निवडणुकीपूर्वी राडा ! महायुतीच्या उमेदवाराकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मारहाण
भैय्या रामदास पाटील असे आत्महत्या करणाऱ्या पित्याचे नाव असून मुलगी घरी आल्यानंतर सदर घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. मात्र ती घरी परत आल्याने विक्री करणाऱ्या महिला व लग्न झालेल्या कुटुंबाकडून मुलीच्या कुटुंबाला धमक्या व पैशाची मागणी केली जात आहे असा आरोपही भैय्या पाटील यांच्या भावाने केला आहे. याबाबत पोलिसात तक्रार देऊनही पोलिसांनी मात्र तक्रार न घेता या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.