जाहिरात

Kalyan : APMC निवडणुकीपूर्वी राडा ! महायुतीच्या उमेदवाराकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मारहाण

Kalyan APMC Election :  महायुतीचे उमेदवार कपील थळे यांनी महाविकास आघााडीचे उमेदवार प्रशांत माळी यांना मारहाण केली आहे.

Kalyan : APMC निवडणुकीपूर्वी राडा ! महायुतीच्या उमेदवाराकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मारहाण
Kalyan APMC Election :  कल्याण एपीएमसीच्या संचालक पदाच्या निवडणूकीपूर्वी मोठा गोंधळ झाला आहे.
मुंबई:

Kalyan APMC Election :  कल्याण एपीएमसीच्या संचालक पदाच्या निवडणूकीसाठी उद्या (रविवार, 28 जून) मतदान होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी आज (शनिवार, 27 जून) निवडणूकीच्या रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार कपील थळे यांनी महाविकास आघााडीचे उमेदवार प्रशांत माळी यांना मारहाण केली आहे.

थळे यांनी माळींना गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. हा सगळा प्रकार एपीएमसीच्या प्रशासकीय कार्यालयातील पहिल्या मजल्यावर झाला आहे. या प्रकरणी माळी यांनी थळे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले आहे. पोलिसांकडून पुढील प्रक्रिया सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

एपीएमसीच्याच्या संचालक पदाच्या निवडणूकीत 15 उमेदवार उभे आहे. त्यासाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणूकीत एपीएमसीचे माजी सभापती कपील थळे हे महायुतीतर्फे निवडणूकी रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीतर्फे प्रशांत माळी हे निवडणूक रिंगणात आहे. थळे यांच्या भ्रष्टाचारावर माळी यांनी निवडणूक प्रचारात बोट ठेवले.

( नक्की वाचा : Dombivli News : ऐन पावसाळ्यात डोंबिवलीकर होणार बेघर, 'ती' इमारत पाडण्याचे कोर्टाचे आदेश )

या गोष्टीचा राग धरुन थळे यांनी आज माळी यांनी एपीएमसीच्या प्रशासकीय कार्यालयाजवळ गाठले. त्यांच्यासोबत काही त्याचे समर्थक होते. त्यांनी माळी यांना मारहाण केली. त्यांना शिवीगाळ करीत गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे असा आरोप माळी यांनी केला आहे.

( नक्की वाचा : Dombivli : 65 बेकायदा इमारत प्रकरणी काय तपास केला? उच्च न्यायालयाची ED ला विचारणा )

 या प्रकरणी माळी यांनी बाजारपेठ पाेलीस ठाणे गाठले आहे. त्यांनी घडला प्रकार पोलिसाना सांगून त्यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी माळी यांना वैद्यकीय तपासणीकरीता रुग्णलायात पाठविले आहे. त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुढील प्रक्रिया पोलिसांकडून केली जाणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com