Jalgaon Crime: 'राजस्थानवरुन पार्सल आलंय..' एका कॉलने मामा- भाचा अडकले, डांबून ठेवत भयंकर केलं

वेगाने कारवाई करत शनिपेठ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन तासांत अकोला येथे धडक देत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून गणपतलाल माळी यांची सुटका केली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव: 

Jalgaon Crime:  राजस्थानहून पार्सल आल्याचा बहाणा करून मामा-भाच्यांचे अपहरण करून तब्बल २० लाखांची खंडणी मागितल्याची थरारक घटना उघडकीस आली. मात्र, चित्रपटाला लाजवेल अशा घटनेची वेगाने कारवाई करत शनिपेठ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन तासांत अकोला येथे धडक देत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून गणपतलाल माळी यांची सुटका केली. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव मधील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल साहित्य विक्री करणारे कृष्णकुमार चौधरी व त्यांचा भाचा गणपतलाल माळी यांना यश जितेंद्र माकोडे याने फोन करून राजस्थानहून पार्सल आल्याचे सांगितले. ममुराबाद रस्त्यावरील एका दुमजली इमारतीत नेऊन भाच्याला बांधून ठेवण्यात आले, तर मामालाही चाकूचा धाक दाखवत बसविण्यात आले.

Crime News: 'हनी ट्र्रॅप' स्टाईल टोळीमुळे नवी मुंबईकर चिंतेत! भीक मागून नागरिकांना बनवतात कंगाल

“तू मला मारण्याची सुपारी दिली,” असा खोटा आरोप करत आरोपींनी त्यांना धमकावले. यानंतर दोघांना दुचाकीवरून भुसावळच्या दिशेने नेत अकोल्यात डांबून ठेवण्यात आले. भाच्याला ओलिस ठेवत त्याला सोडवायचे असेल तर २० लाख रुपये घेऊन ये, असा दम देण्यात आला. मात्र प्रसंगावधान राखत कृष्णकुमार चौधरी पहाटे जळगावात पोहोचले आणि थेट शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

दरम्यान, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पहाटेच अकोल्यात सापळा रचत यश माकोडे व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या तीन तासांत पोलिसांनी गणपतलाल यांची सुखरूप सुटका केली. या धाडसी कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या भयंकर घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

Topics mentioned in this article