Jalgaon Serial Killer: दोघींना संपवलं, तिसऱ्या हत्येचा प्लॅन अन्... जळगावचा 'लेडी सिरीयल किलर अटकेत

Jalgaon lady Serial Killer: अनिल संदानशिव हा महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. त्यांना गोड बोलून सुमठाणे जंगलात नेऊन त्यांच्याशी शरीर संबंध ठेवायचा.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव:

Jalgaon lady Serial Killer Story: जळगाव जिल्ह्यात घडलेल्या सिरीयल किलिंग हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जळगावमध्ये एका विकृताने दीड महिन्यात दोन महिलांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हा सिरीयल किलर प्रेमाच्या जाळ्यात फसवून सोमठाणे जंगलात शरीर संबंध ठेवून डोक्यात दगड घालून महिलांची हत्या करायचा. त्याने तिसऱ्या महिलेला ठार करण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र सुदैवाने ती बचावली.

समोर आलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या सुमठाणे येथील लेडी सिरीयल किलर अनिल संदानशिव यास पोलिसांनी अटक केली आहे.  या नराधमाने दीड महिन्यात दोन महिलांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अनिल संदानशिव हा महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. त्यांना गोड बोलून सुमठाणे जंगलात नेऊन त्यांच्याशी शरीर संबंध ठेवायचा.

Lonavala Crime: तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं, अत्याचार करुन रस्त्यात फेकलं; लोणावळ्यात खळबळ!

त्यानंतर त्यांची डोक्यात दगड घालून हत्या करत त्यांच्या जवळून सोन्याचे दागिने व पैसे लुटायचा. आतापर्यंत या लेडीज सिरीयल किलरने दोन महिलांची एकाच जागी व एकाच प्रकारे हत्या केली केली. त्याने तिसऱ्या महिलेची हत्या करण्याचा प्लॅनही आखला होता. तो तिसऱ्या महिलेला जंगलात घेऊन जात असताना तिने आरडा-ओरडा केला, ज्यामुळे ती महिला थोडक्यात बचावली. 

अनित संदानशिव गोड बोलून महिलांना प्रेमात पाडायचा. त्याच्या गोड बोलण्याने भुलून महिला त्याच्या प्रेमात पडायच्या. महिलेला प्रेमात पाडल्यानंतर तो विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांचा अत्यंत निर्घृणपणे काटा काढायचा. त्याने  शोभाबाई कोळी आणि वैजयंताबाई भोई या दोन महिलांनाही त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. गोड बोलून संबंध ठेवले आणि त्यानंतर जंगलात नेऊन त्यांची हत्या केली. 

Advertisement

WhatsApp group ला बळी पडू नका! शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली अन् डॉक्टरांचे 26 लाख उडाले

या किलरने शोभाबाई कोळी व वैजंताबाई भोई या दोन महिलांचा खून केल्याचे कबूल केले आहे. तसेच तो शाहनाज बी या महिलेचीही हत्या करणार होता. मात्र तिसऱ्या महिलेने वेळीच हुशारी दाखवल्याने तिचा जीव वाचला. अनिल संदानशिव या सिरीयल किलरच्या या पाशवी कृत्यांमुळे जळगाव जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.