Election News Update: ठाकरे गटाच्या 35 उमेदवारांचे अर्ज बाद होणार? भाजपच्या आक्षेपाने जोरदार धक्का

Jalgaon News: निवडणूक नियमावलीनुसार, एबी फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत स्वाक्षरी कर्त्याची मूळ स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. स्कॅन किंवा फोटोकॉपी केलेली सही ग्राह्य धरली जात नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव

Jalgaon Election News: जळगाव महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप-शिंदे गट यांच्यात कायदेशीर युद्ध सुरू झाले आहे. ठाकरे गटाच्या 35 उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत जोडलेल्या एबी फॉर्मवर 'स्कॅन केलेली सही' असल्याचा दावा भाजपने केला असून, हे सर्व अर्ज निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बेकायदेशीर ठरवून रद्द करण्याची मागणी केली आहे.

काय आहे नेमका वाद?

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, कोणत्याही अधिकृत राजकीय पक्षाच्या उमेदवाराला दिला जाणारा एबी फॉर्म हा मूळ स्वरूपात असणे आवश्यक असते. भाजपचे उमेदवार अरविंद देशमुख आणि इतर उमेदवारांनी असा आक्षेप घेतला आहे की, ठाकरे गटाच्या 35 उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या एबी फॉर्मवर बॉलपेनने केलेली मूळ सही नसून ती स्कॅन केलेली प्रतिमा आहे.

(नक्की वाचा- KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत भाजपने खातं उघडलं, निवडणुकीआधीच 2 उमेदवार विजयी)

नियम काय सांगतो?

निवडणूक नियमावलीनुसार, एबी फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत स्वाक्षरी कर्त्याची मूळ स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. स्कॅन किंवा फोटोकॉपी केलेली सही ग्राह्य धरली जात नाही.

शिंदे गटाचाही पाठिंबा

या वादात केवळ भाजपच नाही, तर शिवसेना (शिंदे गट) देखील आक्रमक झाली आहे. शिंदे गटानेही ठाकरे गटाच्या या 'स्कॅन' केलेल्या सह्यांवर आक्षेप नोंदवला असून भाजपच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. अरविंद देशमुख यांनी म्हटले आहे की, "जर नियम सर्वांसाठी सारखे असतील, तर स्कॅन केलेली सही असलेल्या अर्जांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले पाहिजे."

Advertisement

(नक्की वाचा-  Pune Traffic: भीमा-कोरेगाव शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज, बुधवारपासून वाहतुकीत मोठे बदल, चेक करा पर्यायी मार्ग)

आता सर्वांचे लक्ष छाननीकडे

निवडणूक निर्णय अधिकारी या आक्षेपांवर काय निर्णय घेतात, यावर ठाकरे गटाच्या 35 उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. जर हे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाले, तर जळगाव महापालिकेत ठाकरे गटाला मोठा फटका बसू शकतो आणि भाजप-शिंदे गटाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. 31 डिसेंबरच्या छाननी दरम्यान यावर अंतिम निकाल अपेक्षित आहे.

Topics mentioned in this article