Jalgaon News: मंत्री गुलाबराव पाटील 42 वर्षांनी शाळेत, वडिलांकडून कसा प्रसाद मिळायचा? खास किस्सा सांगितला

Jalgaon News: वर्गात आम्ही इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढायचो वडिलांकडे तक्रार गेली की वडिलांचा प्रसाद मिळायचा असा किस्साही त्यांनी सांगितला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव: राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री शिवसेना नेते गुलाबराव पाटील त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी, धडाकेबाज भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. गुलाबराव पाटील यांच्या विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असते. राजकीय विरोधकांवर तुटून पडणारे नेते अशी ओळख असलेले गुलाबराव पाटील 42 वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेत रमल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी त्यांच्या शाळेतील खास आठवणीही सांगितल्या.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा एकदा 42 वर्षानंतर आपल्या शालेय आयुष्यामध्ये रमल्याचे पाहायला मिळाले. शाळेच्या  माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनात गुलाबराव पाटलांनी विद्यार्थी होऊन पुन्हा एकदा शाळेतील आठवणींना उजाळा दिला. तसेच वर्गात आम्ही इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढायचो वडिलांकडे तक्रार गेली की वडिलांचा प्रसाद मिळायचा असा किस्साही त्यांनी सांगितला. 

जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील स. न. झंवर विद्यालयात 1982- 83 बॅच मधील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात शाळेचे माजी विद्यार्थी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्या तत्कालीन शालेय शिक्षक व मित्रांसोबत सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या स्नेहसंमेलनाप्रसंगी 42 वर्षानंतर गुलाबराव पाटील त्याच वर्गात बसून आपल्या तत्कालीन वर्गशिक्षिकेकडून कवितेचे धडे ही गिरवले.

नक्की वाचा - Melghat Jungle Safari : मेळघाट जंगल सफारीचा प्लान करताय? आधी ही बातमी वाचा!

दरम्यान, या क्षणांमुळे विद्यार्थी दशेतील अनुभव गुलाबराव पाटलांनी याप्रसंगी अनुभवला. तसेच आपण विद्यार्थ्यांच्या खोड्या काढायचो मात्र त्याची तक्रार वडिलांकडे गेली की वडिलांकडून प्रसाद मिळायचा अशी सोज्वळ कबुली देत गुलाबराव पाटलांनी याप्रसंगी आपल्या शालेय जीवनाला उजाळा दिला.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Rahul Gandhi: 'त्यावेळी मी नव्हतो, पण...', शिख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठं वक्तव्य