'मी मरा नंतर मम्मी रडजो नको जास्त...', प्रेमाला नकार; तरुणाने आई-बाबांसाठी Video करुन स्वत:ला संपवलं

गौरव बोरसे या तरुणाचे अस्मिता नावाच्या मुलीवर प्रेम होतं. अल्पवयीन असताना त्या दोघांनी लग्नही केलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Jalgaon News : प्रेमाला सीमा नसते असं म्हटलं जातं. एखादा जीव ओतून प्रेम करतो, मात्र हेच प्रेम जर त्याला मिळालं नाही तर त्याचं आयुष्य निरस होऊन जातं. अनेकांची मानसिक स्थिती बिघडते. त्यातून बाहेर निघणं कठीण वाटू लागतं. जळगावमधील एका तरुणाने याच प्रेम प्रकरणातून स्वत:ला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गौरव रवींद्र बोरसे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. 

नेमकं काय घडलं? 

गौरव बोरसे या तरुणाचे अस्मिता नावाच्या मुलीवर प्रेम होतं. अल्पवयीन असताना त्या दोघांनी एकमेकांशी लग्नही केलं होतं. मात्र आता अस्मिताने लग्न करण्यास नकार दिला. प्रेयसीने प्रेमाला नकार दिल्याने गौरव नैराश्यात होता. यातून समाज माध्यमावर व्हिडिओ पोस्ट करून त्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातल्या गांधली गावात घडली आहे. प्रेयसी माझं खरं प्रेम विसरली त्यामुळे मी जी चूक केली ते तुम्ही करू नका असा व्हिडिओ तरुणाने पोस्ट करत गावालगत असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात हलवला आहे. सदर घटनेमुळे गांधली गावात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - श्वास घ्यायला त्रास, 10 वर्षांपासून आजारपण, कबुतरांच्या एक पिसामुळे मुंबईच्या वनिता सांगडेंचं आयुष्य उद्ध्वस्त

आई-वडिलांची मागितली माफी...

या व्हिडिओमध्ये त्याने आई-वडिलांची माफी मागितली आहे. आई-बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप केलं, माझ्या शिक्षणासाठी खूप खर्च केला. मात्र मी तुमची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. या व्हिडिओमध्ये गौरवने इतर तरुणांनाही सल्ला दिलाय. 'मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. शिक्षणाकडे लक्ष द्या. आई-वडिलांचे पैसे वाया घालवू नका. मला अनेकांनी सांगितलं आई-वडिलांचा विचार कर, तिचा विचार सोड. पण मला खूप त्रास होतोय.'

Advertisement

अहिरणी भाषेत गौरवचा आई-वडिलांना संदेश...

मी तुमन स्वप्न पूर करू नाय शकनू (मी तुमचा स्वप्नं पूर्ण करू शकलो नाही)

मी मरा नंतर मम्मी रडजो नको जास्त... (मम्मी मी मेल्यानंतर जास्त रडू नको)

बाप्याले भी सांगजो वय...(बापूलाही सांगशील )

मना पप्पा गयरा ना, गयरा गरीब माणूस शे यार... (माझे पप्पा खूप गरीब माणूस आहे. )

मी सांगी ऱ्हायनु प्लीज मम्मी मना पप्पाले त्रास नको देजो...(मी सांगतोय मम्मी प्लीज या माझ्या बापाला त्रास नको देशील. )

हा मना लास्ट व्हिडिओ शे...(हा माझा लास्ट व्हिडिओ आहे.)