मंगेश जोशी, प्रतिनिधी
बहिण-भावांच्या नात्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. राखी पौर्णिमा सुरु होण्यास आता काही तास शिल्लक आहेत. सर्व भावंड या दिवसाची आतुरतेनं वाट पाहात असतात. भावाला राखी बांधण्यासाठी किंवा बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी शेकडो किलोमीटर प्रवास करणारे अनेक जण आहेत. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी (17 ऑगस्ट) एक भयंकर दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जळगाव जिल्ह्यातल्या पिंपरखेड शिवारातल्या 4 सख्ख्या भावंडांचा रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरखेड परिसरातील केटी वेअर धरण परिसरात ही सर्व भावंड खेळायला गेली होती. त्यावेळी धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
( नक्की वाचा : सावित्री नदीत एकाच कुटुंबातील तीन जण बुडाले )
खेळत असताना पाय घसरून चारही भाऊ बहिण क्षणार्धात बुडाल्याने चौघांचाही मृत्यू झालाय. शेतमजूर कुटुंबातील ही मुलं असल्याची माहिती मिळतीय. त्यांच्या मृत्यूनं शेतमजूर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.