सावित्री नदीत एकाच कुटुंबातील तिघे बुडाल्याची घटना घडली आहे. महाड तालुक्यातल्या वहूर आणि सव जवळून वाहणाऱ्या सावित्री नदीत ही घटना घडली. महाबळेश्वर इथून हे कुटुंब सव इथल्या दर्ग्यात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते नदी अंघोळीसाठी उतरले. पण त्यातील कोणालाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे एका मागोमाग तिघेही पाण्यात बुडाले आहेत. ही घटना लक्षात आल्यानंतर रेस्क्यू टिम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सव इथे दर्गा आहे. तिथे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. महाबळेश्वरहून शहाबुद्दीन कुटुंबातील लोक या दर्ग्यावर पाया पडण्यासाठी सव इथे आले होते. त्यावेळी दिलावर शहाबुद्दीन नालबंद, मुनावर शहाबुद्दीन नालबंद आणि जाहिद जाकीर पटेल हे तिघे जण सावित्री नदीच्या पात्रात उतरले. पण त्यांना पाण्याच्या खोलीचा काहीही अंदाज आला नाही. त्यांनी ते खोल पाण्यात बुडून गेला.
या तिघांमधील एक जण पाण्यात पोहण्यासाठी उतरला होता. तो बुडत आहे हे अन्य दोघांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी अन्य दोघांना पाण्यात उडी मारली. पण ते त्याला वाचवू शकले नाही. उलट ते दोघेही पाण्यात बुडाले. त्यानंतर रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. महाड आणि पोलादपूर येथील रेस्क्यू टिम सव इथे दाखल झाल्या. त्यांच्या मदतीला मच्छिमारांच्या बोटीही होत्या.
नक्की वाचा - न्यायालयातच वकील कोसळला, न्यायाधीशही धावले; नागपुरात वकिलाचा धक्कादायक शेवट!
सावित्रीच्या पात्रात या तिघांचाही शोध घेतला जात होता. त्यातील जाहिद पटेल आणि दिलावर नालबंद या दोघांचा मृतदेह सापडला आहे. तर त्यांच्या अजून एका भावाच शोध रेस्क्यू टिम घेत आहे. हे सर्व जण एकाच कुटुंबातील होते. ते महाबळेश्वर वरून आले होते. एकाच दिवशी एकाच कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातल्याने शहाबुद्दीन कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. काही वेळाने तिसऱ्याचाही मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world