लक्ष्मण सोळुंके, जालना: प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या पोटाला प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करताना जेली ऐवजी ऍसिड लावल्याचा संतापजनक प्रकार जालन्यामधून समोर आला आहे. जालन्याच्या भोकरदान येथील ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडला. या घटनेनंतर महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला असून महिला गंभीर भाजल्याने तिच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेची प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करताना महिलेच्या पोटाला जेली आयवजी नर्सकडून ऍसिड लावण्यात आल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शिला संदीप भालेराव असे या प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेचे नाव आहे. सोनोग्राफीच्या अर्ध्या तासानंतर या महिलेने गोंडस बाळाला जन्म ही दिला आहे. बाळ सुखरूप आहे. मात्र महिलेल्या पोटासह अवघड जागा भाजल्याने महिलेवर उपचार सुरु आहेत. ऍसिडचे इन्फेक्शन झाल्याने महिला गंभीर भाजली आहे.
ग्रामीण रुग्णालयातील ब्रदरने सोनोग्राफी रूममध्ये औषधाच्या ट्रेमध्ये सोल्युशनऐवजी ऍसिड ठेवल्याने चुकून नर्सकडून ऍसिड लागले असल्याची माहिती रुग्णालयात प्रशासनकडून नातेवाईकांना देण्यात आली. मात्र सोनोग्राफी दरम्याने पोटातील बाळाचे ठोके चेक करताना नर्सने पोटावर ऍसिड टाकल्यानंतर गर्भवती महिला ओरडू लागल्याने नातेवाईकांनी नर्सला विचारणा केली.
Hinjewadi News: हिंजवडी IT पार्कचा पालिकेत समावेश करा..', नागरिकांसह आयटीयन्सचे आंदोलन
यावेळी नर्सने त्यांच्यावरच आरडाओरड करून रुग्णालयातून दोन तास पसार झाली होती असा गंभीर आरोप ही महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान महिला गंभीर भाजल्याने तिच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयातचं उचार केल्या जातं आहे. या घटनेने भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.