लक्ष्मण सोळुंके, जालना: जालन्यामधील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकच दारुच्या नशेत वर्गात झोपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दाऊदपूर जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. मद्यधुंद अवस्थेतील मुख्याध्यापकांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पालकांकडून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दारूचे नशेत बेधुंद अवस्थेत वर्ग सुरू असताना मुलांसमोरच टेबलावर पाय ठेवून खुर्चीवर शिक्षक झोपण्याचा प्रकार जिल्हा परिषद शाळेतील प्रकार समोर आला होता. आता पुन्हा जालना जिल्ह्यातील शाळेतील भोकरदन तालुक्यात दाऊदपूर टाकळी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापकचं शाळेत दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत झोपल्याचा प्रकार आलाय आहे.
दामू भीमराव रोजेकर या मुखध्यापकाचे नाव असल्याची माहिती समोर आली असून शुक्रवारी हा मुखध्यापक शाळेत दारूच्या नशेत आला असताना त्याला त्याला काहीच सुधरत नसल्याने त्यांनी चक्क शाळेतील विद्यार्थी शाळे बाहेर जाताच शाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गात मुलांसाठी असलेली सतरंजी फरशीवर अंथरून त्यावर दिवसभर झोप काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.
Bhiwandi News: तरुण बुडू लागला, मित्रांनी पळ काढला; अखेर 24 तासांनी.. भिवंडीतील दुर्दैवी घटना
त्यानंतर दारूची नशा उतरल्यानंतर या मुख्यध्यापकणे शाळेतून पळ काढल्याची माहिती ही समोर आली आहेय शाळेत घडलेल्या या घटनेनेमुळे पालक वर्गातून संताप व्यक्त केला जातं असून मुख्याध्यापकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पालकाकडून केली जात आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.