जाहिरात

Pravin Gaikwad News: आरोपी सराईत गुन्हेगार, भाजपशी कनेक्शन.. प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर राजकारण तापलं

Praveen Gaikwad Sambhaji Brigade News: भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 

Pravin Gaikwad News: आरोपी सराईत गुन्हेगार, भाजपशी कनेक्शन.. प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर राजकारण तापलं

Praveen Gaikwad Attack News: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर शाईफेक केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अक्कलकोट येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्यावर शाईफेक केली. याप्रकरणी शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष दीपक काटे याच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर विरोधक आक्रमक झाले काटे हा शिवप्रेमी नव्हे सराईत गुन्हेगार तसेच भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप केला आहे. 

Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर हल्ला, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/खासदारकी/महामंडळ देऊनच टाका.. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 

महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली. हे सर्व अतिशय अस्वस्थ करणारे असून या घटनेचा निषेध करावा तितका कमीच आहे. हे निषेधार्ह कृत्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या हल्ल्यावरुन संताप व्यक्त केला आहे. 

Sambhaji Brigade: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना फासलं काळं

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध आहे. अशारितीने जाणीवपूर्वक समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला जातोय. यामागे कोणती डोकी आहेत? हे आपल्याला माहिती आहे. या भ्याड हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या हल्ल्यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com