Jayakwadi Dam: जायकवाडी धरण 50 टक्के भरले, पाणीटंचाईची चिंता मिटली!

जायकवाडी धरणात सध्या 16,295 क्युसेक (Cusec) पाण्याची आवक सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
छत्रपती संभाजीनगर:

मराठवाड्यासाठी (Marathwada) अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) आता 50 टक्के भरले आहे. यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईची (Water Scarcity) चिंता काही अंशी मिटली आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जायकवाडीमुळे मराठवाड्याची तहान भागवली जाते. शिवाय शेतीला हा पाणी दिले जाते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जायकवाडी धरणात सध्या 16,295 क्युसेक (Cusec) पाण्याची आवक सुरू आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील धरणांमधून (Dams) पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. सध्या सुरू असलेली आवक पाहता, धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा निर्माण झाली आहे. येणाऱ्या काही काळात धरणात येणाऱ्या पाण्याची आवक आणखी वाढणार आहे. त्यामुळे जायकवाड लवकरच शंभर टक्के भरेल. 

ट्रेंडिंग बातमी - Satara News: अलिशान बंगले, कोट्यवधींच्या गाड्या, 200 कोटींची जमीन, ओझी वाहणारा कामगार कसा बनला करोडपती?

जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि जालना (Jalna) या दोन्ही प्रमुख शहरांसाठी पिण्याच्या पाण्याचा (Drinking Water) मुख्य स्रोत आहे. याशिवाय, छत्रपती संभाजीनगरमधील अनेक औद्योगिक वसाहतींनाही (Industrial Estates) याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे, धरण 50 टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्याची आणि औद्योगिक वापरासाठीच्या पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

ट्रेंडिंग बातमी - Nagpur Underworld Story: डॉनच्याच बायकोवर प्रेम! मग अफेअर, अपघात अन् संशय

मराठवाड्याच्या दृष्टीने जायकवाडी धरण हे जीवनवाहिनी मानले जाते. या धरणाच्या पाणीपातळीवरच येथील शेती आणि जनजीवन अवलंबून आहे. यंदा चांगल्या पावसामुळे धरण लवकर भरल्याने येत्या काळात शेती सिंचनासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे, दुष्काळाच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी मराठवाड्याला एक मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement