
संजय तिवारी
गँगस्टरच्या बायकोशी प्रेम आणि तेही डॉनच्या बायकोशी? इप्पा गँगच्या 'अरशद टोपी'ने हीच चूक केली. आता त्याचा जीव धोक्यात आहे. नागपूरच्या कुख्यात अंडरवर्ल्डमध्ये सध्या एकाच नावाचा बोलबाला आहे, तो म्हणजे अरशद टोपी. त्याला जिवंत किंवा मृत आणण्याचा फर्मान काढण्यात आलं आहे. हे फर्मान पोलिसांनी नाही तर एका गँगस्टरने काढलं आहे. त्यामुळे सध्या नागपूरमध्ये गँगवारची चाहूल लागली आहे. त्यामुळे हा 'अरशद टोपी' जीवाची भीक मागण्यासाठी पोलिसांच्या आश्रयाला पोहोचला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अरशद हा त्याच गुंडांपैकी एक आहे, जो पूर्वी इप्पा गँगचा विश्वासू होता. परंतु नंतर तो आपल्याच गँगच्या डॉनच्या पत्नीच्या प्रेमात पडला. या प्रेमाचा परिणाम इतका भयंकर असेल, याचा कदाचित अरशदनेही विचार केला नव्हता. संध्याकाळच्या वेळी अरशद टोपी आणि त्याची प्रेयसी म्हणजेच डॉनची बायको बाईकवरून निघाले होते. ते अशा ठिकाणी जाणार होते जिथे त्यांना कोणी पाहाणारं नव्हतं. त्याचवेळी अचानक त्यांच्या बाईकला एका मोठ्या जेसीबीने धडक दिली. या अपघातात टोपीची गर्लफ्रेड त्या डॉनची बायको गंभीर जखमी झाली. तर टोपी किरकोळ जखमी झाला. रुग्णालयात गेल्यानंतर तिचा मात्र मृत्यू झाला.
मात्र डॉनने हा अपघात नाही तर घातपात असल्याचा आरोप केला आहे. तो म्हणाला हा अपघात नसून हत्या आहे. ही हत्या अरशद टोपी यानेच केली असल्याचा त्याने आरोप केला आहे. मात्र, या दुर्घटनेबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, यात कोणत्याही प्रकारच्या कटाचे संकेत मिळालेले नाहीत. असे म्हटले जात आहे की, पोलिसांची ही गोष्ट संबंधीत गँगपर्यंतही पोहोचवली हे, जेणेकरून रक्तपात टाळता येईल असं सुत्रांकडून समजत आहे.
आता नागपूरची कुख्यात इप्पा गँग आपल्याच साथीदाराच्या शोधात निघाली आहे. अरशद टोपीला जिवंत किंवा मृत आणण्याचा फर्मान त्यांनी जारी केलं आहे. चाळीसहून अधिक सशस्त्र गँगस्टर संपूर्ण शहरात पसरले असल्याची सुत्रांची माहिती आहे. डॉनने इनपुट आणि बॅकअपसाठी इतर गँगशीही संपर्क साधला आहे. पोलिसांना याची पूर्ण माहिती असल्याचं आता समोर येत आहे. जीव जाण्याच्या भीतीने शेवटी अरशद टोपी थेट परडी भागातील झोनल डीसीपी निकेतन कदम यांच्या कार्यालयात पोहोचला.
त्याने आपल्या संरक्षणाची मागणी केली आहे. डीसीपी कदम यांनी त्याला कोराडी पोलीस ठाण्यात पाठवले, तिथे त्याचे आपला जबाब नोंदवला आहे. डीसीपींनी स्पष्ट केले की, अपघातात कोणत्याही कटाचे संकेत मिळालेले नाहीत, ही गोष्ट त्यांनी गँगपर्यंतही पोहोचवली, जेणेकरून हिंसा टाळता येईल. अरशद पोलिसांच्या संरक्षणात जिवंत वाचेल की डॉनच्या गोळ्या त्याच्यापर्यंत आधी पोहोचतील, हा मोठा प्रश्न आहे. रक्तपात होणार नाही, यावर पोलिसांचा विश्वास नाही. कोराडी, तहसील आणि क्राईम ब्रँच पूर्णपणे अलर्टवर आहेत. नागपूरच्या रस्त्यांवर गँगवारचा धोका निर्माण झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world