Malhar Certification : मल्हार सर्टिफिकेशनवरून जेजुरीकर विरुद्ध राणे संघर्ष पेटणार असल्याची चिन्हं आहेत. सरकारनं नाव बदलावं अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा जेजुरीकरांनी दिली आहे. तर समर्थन दर्शवणाऱ्या विश्वस्थांनाही गावबंदी करण्याचा इशारा असून मल्हार सर्टिफिकेशनवरून जेजुरीकरांचा संताप होत असल्याचं दिसून येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मटण दुकानांना दिल्या जाणाऱ्या मल्हार सर्टिफिकेशनवरून जेजुरीकर संतप्त झाले आहेत. अखंड महाराष्ट्राच कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत खांदेकरी, मानकरी, पुजारी आणि जेजुरी ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत मल्हार या नावाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. या बैठकीत मल्हार नावाला समर्थन दर्शवणाऱ्या विश्वस्तांचाही निषेध नोंदविण्यात आला. सरकारनं "मल्हार सर्टिफिकेशन" नाव बदलण्यासाठी जेजुरीकर आग्रही असून मल्हार नाव बदला अन्यथा आमरण उपोषण आणि मल्हार नावाला समर्थन दर्शवणाऱ्या विश्वस्थांनाही गाव बंदीचा इशारा देण्यात आला आहे.
नक्की वाचा - Nitesh Rane: शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम होते का? थेट वंशजानेच आता नितेश राणेंना सत्य सांगितले
झटका मटण दुकानांना मंत्री नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन देण्याची घोषणा केली आणि संपूर्ण राज्यभर एकच वादंग सुरू झाला तो म्हणजे या योजनेला दिलेलं मल्हार नाव तात्काळ रद्द करा. जेजुरीचा खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत आहे. आणि मल्हार म्हणजेच खंडोबा होय. त्यामुळे मल्हार नावाला कडाडून विरोध होतोय. दरम्यान राणे यांनी केलेले या घोषणामुळे मोठा वाद उफाळून आला. राणे नेमकं काय म्हणाले?
हिंदू देव-देवतांची नावे देण योग्य नाही...
जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लाखोंनी भाविक जेजुरीच येतात. अवघ्या महाराष्ट्राच हे कुलदैवत आहे. त्यामुळे अशा सरकारी योजनांना हिंदू देवतांची नावे देणे योग्य नाही, म्हणत सर्वप्रथम श्री मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी याला विरोध दर्शवला. खेडेकरांच्या या विरोधानंतर हा लढा अधिकच तीव्र होताना दिसतोय. मल्हार सर्टिफिकेशनला विरोध दर्शवण्यासाठी जेजुरीकर पेटून उठले असून जेजुरीकरांच्या या लढ्यात ब्राह्मण समाजानेही पाठिंबा दर्शवला आहे.
तर मल्हारचा हलालशी संलग्न होऊ नये. याचा दुरोगामी परिणाम फार वाईट होणार आहे, असं येथील पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. वेळ पडली तर आमरण उपोषण करून पण राणेंना त्यांची जागा दाखवू असा इशाराच जेजुरीकरांनी दिला आहे. आता जेजुरीकर आणि खांदेकरी मानकरी पुजारी हे मंत्री नितेश राणेन सह सरकारला एक पत्र लिहिणार आहेत. या पत्राद्वारे मल्हार हे नाव तात्काळ बदलण्याची मागणी केली जाणार आहे. जर मागणी मान्य झाली नाही तर जेजुरी बंद सह मल्हार नावाला समर्थन दर्शवलेल्या विश्वस्तांना देखील गाव बंदी घालू असा इशाराच ग्रामस्थांनी दिला आहे...
नितेश राणे विरुद्ध जेजुरीकर वाद...
मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी जेजुरीत खांदेकरी मानकरी पुजारी यांसह ग्रामस्थांची बैठक पार पडलीय. या बैठकीत मल्हार या नावाला कडाडून विरोध दर्शविण्यात आलाय. वेळप्रसंगी आमरण उपोषण करू पण मंत्री राणेंना धडा शिकवूच अशी भूमिका जेजुरी करांनी घेतल्याने मल्हार नावावरून सुरू झालेलं हा वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात मंत्री नितेश राणे विरुद्ध जेजुरीकर असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.