Jitendra Awhad Protest: लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र विधानभवनात गुरुवारी अत्यंत लाजिरवाणा अन् संतापजनक प्रकार घडला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनामध्येच राडा झाला. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या राड्यानंतर मध्यरात्रीही मोठ्या घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले.
Vidhan Bhavan Rada: विधानभवनात राडा करणारा ऋषिकेश टकले कोण? काय आहे राजकीय पार्श्वभूमी?
विधानभवन परिसरात झालेल्या राड्यानंतर मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केली. रात्री साडे तीन वाजता नितीन देशमुख याला जे जे मध्ये मेडिकल साठी नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. नितीन देशमुखला घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड हे पोलिसांच्या गाडीसमोर आडवे झोपले. यावेळी पोलिसांनी त्यांना अक्षरश: खेचून बाहेर काढले.
जितेंद्र आव्हाड म्हणणं होतं की रात्री देशमुख यास सोडून देतो असं सांगितले होते पण अटक करत असल्याने अचानक विधानभवन येथे आंदोलन सुरू केले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत नितीन देशमुख यांना ताब्यात घेतले. तसंच मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आमदार रोहित पवार आणि पोलिस यांच्या शाब्दिक चकमक झाली. हातवारे करू नका मी आमदार आहे असा दम रोहित पवार यांनी पोलिसांना दिला.
Awhad vs Padalkar: विधानभवनात आव्हाड-पडळकरांचे कार्यकर्ते भिडले, जोरदार राडा
दरम्यान, या संपूर्ण प्रकारावरुन संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या विधानभवनात आज गँग वॉर झाले. भारतीय जनता पक्षाने विधीमंडळात आणि त्यांच्या पक्षात गुंड टोळ्या आणल्या आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र राज्याची संस्कृती उध्वस्त झाली आहे, फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाली! आज ज्याने विधानभवनात दंगल केली ते आमदार पडळकर टीम देवेंद्रचे सदस्य आहेत मोदी शहा यांनी महाराष्ट्रात हे काय पेरले आहे? अत्यंत वेदनादायी असे हे चित्र आहे! खरंच कुठे नेऊन ठेवलाय शिवरायांचा महाराष्ट्र? असं संजय राऊत म्हणालेत.