नवा महिना जवळ आला की त्या महिन्यातील सुट्ट्या कोणत्या आणि महत्त्वाचे दिवस कोणते याबद्दलची उत्सुकता निर्माण होत असते. नव्या महिन्यात जोडून सुट्ट्या आहेत का ? पोर्णिमा, अमावस्या, एकादशी कधी असणार? बँक हॉलिडे कधी असणार असे अनेक प्रश्न नवा महिना जवळ आला की पडायला लागतात. जुलै महिन्यात एकूण 9 महत्त्वाचे दिवस आहेत. हे कोणते दिवस आहेत आणि जुलै महिन्यात सुट्ट्या कोणकोणत्या दिवशी आहेत ते देखील आपण पाहूयात.
(नक्की वाचा: 2025मधील सणउत्सव आणि दिनविशेषांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर)
आषाढी एकादशी कधी आहे ? (When is Ashadi Ekadashi in 2025?)
जुलै महिना हा हिंदू आणि मुस्लिम धर्मियांसाठी महत्त्वाचा आहे. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्याच दिवशी मोहरमही आहे. सरकारने जाहीर केलेल्या 2025 सालासाठीच्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार, मोहरमसाठीची सुट्टी 6 जुलै 2025 रोजी निश्चित करण्यात आली आहे. हा दिवस रविवार आहे. याचा अर्थ असा की, मोहरमची सुट्टी ही साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीच येत असल्यामुळे, शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये यांना वेगळी अतिरिक्त सुट्टी मिळणार नाही.
(नक्की वाचा: 2025मध्ये मिळणार इतके दिवस सुटी, ही यादी पाहून करा प्लानिंग)
6 जुलै रोजी मोहरम रविवारी येत असल्याने, 7 जुलै 2025 (सोमवार) रोजी महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहतील. 6 जुलै हा रविवार असल्याने, त्यादिवशीच्या सुट्टीचा फायदा सोमवारी मिळणार नाही. मोहरमची सुट्टी ही रविवारी येत असल्याने शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा हिरमोड होणार आहे.
गुरुपौर्णिमा कधी आहे? (When is Guru Pournima in 2025?)
जुलै महिन्यात आणखी एक महत्त्वाचा दिवस येतोय तो म्हणजे गुरुपौर्णिमा (Guru Pournima 2025). 10 जुलै रोजी गुरु पौर्णिमा येत असून 9 जुलै रोजी शिर्डीत साईबाबा उत्सवाला प्रारंभ होत आहे. गुरुपौर्णिमा हा गुरुंना वंदन करण्याचा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचा दिवस असून आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटले जाते. याला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते, कारण याच दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते.
जुलै महिन्यात येणारे इतर महत्त्वाचे दिवस कोणते?
संकष्ट चतुर्थी- 14 जुलै,सोमवार
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन-18 जुलै,शुक्रवार
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती-23 जुलै,बुधवार
संत सावता माळी पुण्यतिथी- 23 जुलै,बुधवार
श्रावण मासारंभ- 25 जुलै,शुक्रवार
विनायक चतुर्थी- 28 जुलै,सोमवार
नागपंचमी- 29 जुलै,मंगळवार