जगात वेगवेगळे विक्रीम नोंदवले जातात. त्यासाठी international Book of records प्रसिद्ध आहे. असचं एक रेकॉर्ड सध्या समोर आलं आहे. हे रेकॉर्ड आणि जगातील सर्वात ठेंगण्या मुलीचं. हो जगातील दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी. विशेष म्हणजे ही मुलगी महाराष्ट्रात सापडली आहे. तिची उंची मोजल्यानंतर तिने हे रेकॉर्ड आपल्या नावावर केलं आहे. शिवाय त्याबाबतच प्रमाणपत्र ही तिला international Book of records मार्फत देण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुलगी जगातील दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी ठरली आहे.
जगात दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी दुसरी तिसरी कुठे नाही तर चंद्रपूर जिल्ह्यात आढळली. दोन फूट तीन इंच एवढीच तिची उंची आहे. त्यामुळे तिची नोंद आता international Book of records मध्ये झाली आहे. राजेश्वरी गुणेदार असे या मुलीचे नाव आहे. ती चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात परसोडी येथील रहिवासी आहे. तिला ही याची कल्पना नव्हती की ती जगातली उंचीनं सर्वात छोट मुलगी आहे.
पण काही युवकांना ती रस्त्याच्या कडेला चालताना दिसली. तिची उंची बघून त्यांना आश्चर्य वाटले. तिची त्या तरुणांनी विचारपूस केली. तिची सर्व माहिती घेतली. त्यानंतर तिची उंची मोजली. तेव्हा त्या तरुणांच्या लक्षात आले की, जिवंत असलेल्या व्यक्तींमध्ये तिची उंची जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे. त्यामुळे तिची कुठेतरी नोंद व्हायला हवी असं त्यांना वाटलं. शिवाय तिला ओळख प्राप्त व्हावी असं ही त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी पुढची पावलं उचलली.
त्यांनी त्या मुलीला तिची ओळख मिळलून देण्याच्या उद्देशाने international Book of records कडे संपर्क केला. शिवाय आवश्यक ती कागदपत्र ही त्यांना पाठवून दिली. त्यानंत त्यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यात अखेर त्यांना यश मिळाले. जरी तिची उंची जगात दुसऱ्या क्रमांकाची असली, तरी तिची नोंद जागतिक संस्थेने घेतली आहे. शिवाय तिला त्याबाबतचं प्रमाणपत्र ही बहाल केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिला हे प्रमाणपत्र नुकतेच देण्यात आले.