जाहिरात

Dombivli News: मुलगा नाल्यात पडला, वाचवण्यासाठी आई-बापाचा टाहो, पण 'ते' सर्व जेवणात मग्न

आता या प्रकरणात नाल्याचे झाकण उघडे राहण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

Dombivli News: मुलगा नाल्यात पडला, वाचवण्यासाठी आई-बापाचा टाहो, पण 'ते' सर्व जेवणात मग्न
कल्याण:

अमजद खान 

डोंबिवलीत अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली आहे. नवरात्रीच्या भंडाऱ्यात जेवण करायला गेलेला 13 वर्षाचा मुलगा नाल्याचे झाकण उघडे असल्याने नाल्यात पडला. मुलाचे आई-वडील इतरांना सांगत होते. आमच्या मुलगा नाल्यात पडला आहे. त्याला वाचवा. पण असंवेदनशील असलेले लोक जेवण करण्यामध्ये मग्न होते. अखेर दोन तासानंतर एका तरुणाने नाल्यात उडी मारली. त्या मुलाला बाहेर काढले.  परंतु त्या 13 वर्षीयचा आयुष कदम याचा उपचारा आधीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले  अर्धा तास पूर्वी आयुषला उपचारासाठी आणले असते तर तो वाचला असता. या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या महापालिका आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या विरोधा कारवाईची मागणी केली जात आहे. एवढेच नाही  आयुष्याच्या कुटुंबाला प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

डोंबिवली पश्चिमेत सरोवर नगर आहे. या परिसरात नवरात्र उत्सव सुरू आहे. रविवारी रात्री या परिसरात राहणारा 13 वर्षाचा आयुष  कदम  हा घराबाहेर पडला. घरच्या लोकांना सांगितले की, मी जेवण करून येतो. मात्र तो घरी आलाच नाही. कुटुंबीय मंडपाजवळ पोहोचले. त्यांना माहिती मिळाली की, आयुष्य मंडपाजवळ असलेल्या नाल्याचा उघड्या झाकणातून नाल्यात पडला आहे. आयुष्याचे कुटुंब मंडपाजवळ जेवण करणाऱ्या लोकांना विनंती करत  होते. त्या ठिकाणी भांडी घासणार्‍या महिला आणि पुरुषांना मुलाला वाचवण्यासाठी टाहो फोडत होते. 

नक्की वाचा - Kalyan News: हातात टमरेल, तोंडात ब्रश, हाफचड्डीवर KDMC मुख्यालयात पोहोचला तरूण, कारण काय?

परंतु कोणीही आयुष्याच्या कुटुंबीयांना दाद देत नव्हते. अखेर काही तरुण पुढे आले. त्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांच्याकडे प्रयत्न सामग्री उपलब्ध नसल्याने अग्निशमन कर्मचारी नाल्यात उतरला तयार नव्हते. अखेर वेदांत जाधव हा तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता नाल्यात उतरला. अर्धा तासाच्या शोधा नंतर  त्याने आयुष्यला बाहेर काढले. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी सांगितले याला अर्धा तास आधी उपचारासाठी आणले असते  तर तो वाचला असता. 

नक्की वाचा - Big News: 1 ऑक्टोबरपासून बदलणार आहेत हे 7 नियम, रेल्वे तिकीट ते UPI काय होणार बदल? वाचा एका क्लिकवर

आता या प्रकरणात नाल्याचे झाकण उघडे राहण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख बाळा म्हात्रे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे घटनास्थळी पोहोचले. पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे तसेच पीडित कुटुंबियाला आर्थिक मदत म्हणून 25 लाखाची मदत प्रशासनाने केली पाहिजे अशी मागणी केली आहे. या प्रकरणात कारवाई कधी होईल?आयुष्याच्या कुटुंबीयाला काय मदत होईल हा नंतरच्या भाग आहे. परंतु महापालिका आणि एम एम आर डी ए अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि नागरिकांच्या  असवेदनशीलमुळे आयुष्याच्या आयुष्य संपले असा आरोप केला जात आहे. दरम्यान डोंबिवलीत उघड्या नाल्यात एका 13  वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला. हा अपघात नाही. तर केडी 'यम'सी आणि बेफिकर प्रशासनाने केलेली हत्या आहे अशा गंभीर आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com