Sindhudurg News: गोवा-पणजी येथून बस कोकणच्या दिशेनं निघाली, 200 फूट खोल दरीजवळ अपघात घडला, 45 प्रवासी अन्..

गोवा पणजी येथून वेंगुर्ल्याच्या दिशेने येणारी कदंबा वाहतूक महामंडळाची प्रवासी बसला आजगाव-वाघबीळ येथील धोकादायक वळणावर अपघात झाला. दु

जाहिरात
Read Time: 2 mins
Kadamba Bus Accident News Today

गुरूप्रसाद दळवी, प्रतिनिधी 

Kadamba Bus Accident News Today : गोवा पणजी येथून वेंगुर्ल्याच्या दिशेने येणारी कदंबा वाहतूक महामंडळाची प्रवासी बसला आजगाव-वाघबीळ येथील धोकादायक वळणावर अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बी बस गटारात कलंडल्याची थरारक घटना आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.अपघात घडला त्या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर 200 फूट खोल दरी असल्याने मोठा अनर्थ ओढवला असता.मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व 45 प्रवासी बालंबाल बचावले आहेत.

बसचा अपघात नेमका कसा घडला?

गोवा पणजी येथून सायंकाळी ४:३० वाजता सुटलेली पणजी-शिरोडा-वेंगुर्ला (गाडी क्र.GA 03 X 0249) ही वस्तीची कदंबा बस आजगाव येथे आली असता समोरून मळेवाडच्या दिशेने एक चारचाकी गाडी जात होती. त्याचवेळी या चारचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी कदंबा बसचालकाने गाडी डाव्या बाजूला घेतली.यात बसचा ताबा सुटून ती रस्त्याशेजारील गटारात कलंडली.

Advertisement

नक्की वाचा >> Sangli News: पत्नीला जिवंत जाळून हत्या करणाऱ्या पतीला सर्वात भयंकर शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली अन्..

अपघात घडलेले वळण अत्यंत धोकादायक असून बस थोडी जरी पुढे घसरली असती तर थेट 200 फूट खोल दरीत कोसळली असती. मात्र चालकाने दाखवलेले चातुर्य आणि वेळेवर घेतलेला निर्णय यामुळे मोठा जीवितहानीचा प्रसंग टळला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.बसचे चालक धनंजय आसोलकर आणि वाहक सर्वेश नाईक यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

नक्की वाचा >> Pune News: आता पुन्हा पुणेकरांची धडधड वाढणार, दबक्या पावलांनी 'तो' पुन्हा आला..सर्व हालचाली कॅमेरात कैद