Mumbai traffic advisory in Kalyan: कल्याणकरांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या दिवंगत आनंद दिघे पुलावर महत्त्वाच्या दुरुस्ती कामासाठी २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या १० दिवसांसाठी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. ठाणे शहर वाहतूक विभागाने या संदर्भात सविस्तर अधिसूचना जारी केली असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कल्याणमधील दिघे पूल 10 दिवस बंद!
समोर आलेल्या माहितीनुसार, दिवंगत आनंद दिघे उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रशासनाकडून डागडुजी केली जाणार आहे. यासाठीच कल्याण पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल बंद ठेवला जाणार आहे. २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ते ४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध लागू असतील. कल्याण पूर्व भागातून पुलाकडे जाणारी अत्यावश्यक तसेच बिगर-अत्यावश्यक वाहने मुख्य प्रवेशद्वारातून पुलावर जाऊ शकणार नाहीत.
वाहनांचे सर्टिफिकेट रिन्यूअल फ्री कमी करा, वाहतूक संघटना आक्रमक, केला गंभीर आरोप
पर्यायी मार्ग कोणते?
दुसरीकडे, कल्याण पश्चिमेकडून पुलाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या पर्यायी अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे. तसेच, कल्याण शहराबाहेरून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी महामार्ग (Highway) आणि कनेक्टर्स निश्चित केले आहेत. प्रवासादरम्यान होणारा संभाव्य विलंब टाळण्यासाठी आणि दैनंदिन कामकाजाच्या वेळेत होणारी गैरसोय कमी करण्यासाठी नागरिकांनी प्रवासाचे काळजीपूर्वक नियोजन करावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
दरम्यान, या निर्बंधांमुळे पुलाजवळील दुकानदारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सकाळी नेहमीच मोठी वाहतूक असते, त्यामुळे हे बदल आव्हानकारक असले तरी आवश्यक आहेत, असे स्थानिक दुकानदारांनी मत व्यक्त केले. या निर्बंधातून रुग्णवाहिका. अग्निशमन दल आणि अत्यावश्यक पोलीस वाहने यांसारख्या आपत्कालीन सेवांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world