जाहिरात

'मुंबईवर कर्नाटकचा हक्क...' काँग्रेस आमदार बरळले, महाराष्ट्रातून संताप

महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावच्या सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी केली होती, त्यावरुनच काँग्रेस आमदाराने हे विधान केले आहे. 

'मुंबईवर कर्नाटकचा हक्क...' काँग्रेस आमदार बरळले, महाराष्ट्रातून संताप

बेळगाव: बेळगावमधील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अशातच कर्नाटक विधानसभेमध्ये काँग्रेसच्या आमदाराने मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, असे म्हणत अकलेचे तारे तोडले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावच्या सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी केली होती, त्यावरुनच काँग्रेस आमदाराने हे विधान केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बेळगावमध्ये सध्या कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात उत्तर कर्नाटकच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान अथणीचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली. महाराष्ट्रातील नेते बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित जाहीर करावा, अशी मागणी करत आहेत.

त्यामुळे आपणही मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी करावी, असं विधान केले. जर कर्नाटकचा अविभाज्य घटक असलेला बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी होत असेल तर मुंबई देखील केंद्रशासित करावी, अशी मागणी आपण केली पाहिजे, असं ते म्हणाले. आमचे पूर्वज मुंबईत वास्तव्यास होते. त्यामुळे आमचा मुंबईवर अधिकार आहे, असं आपण म्हणू शकतो, असंही विधान या आमदाराने केले आहे. 

नक्की वाचा - समुद्रात वेगाने फिरली अन् नेव्हीची स्पीड बोट थेट प्रवासी नौकेला धडकली, अपघाताचा थरारक Video समोर

पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे लोक मुंबईला जात होते त्याठिकाणी वास्तव्यास होते. ही बाब लक्षात घेता आमचा मुंबईवर हक्क आहे, त्यामुळे प्रथम मुंबई केंद्रशासित करावी आणि तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, असा दावाही या आमदाराने केला आहे. 

दरम्यान, काँग्रेस आमदाराच्या या विधानानंतर आता आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.  मुंबई केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे अशी जी मागणी काँग्रेसचे आमदार करत आहेत  त्या आमदारांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी.  जे काँग्रेसच्या राज्यातील आमदारांचे म्हणणं आहे तेच आमचे म्हणणे आहे. रक्त सांडून आम्ही मुंबई  मिळवली आहे, त्यामुळे मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असं ते म्हणालेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: