
विशाल पुजारी, कोल्हापूर: पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये समन्वय ठेवला जाणार आहे. तसेच अलमट्टी धरणातून पाणी विसर्गाची पूर्वसूचना महाराष्ट्र प्रशासनाला वेळेत दिली जाणार असल्याचे कर्नाटक सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच अलमट्टीची पाणीपातळी 15 ऑगस्टपर्यंत 517 ते 517.50 मीटरदरम्यान राखली जाईल असे आश्वासनही कर्नाटक सरकारने दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पावसाळ्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये समन्वय ठेवला जाणार आहे. अलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार याची पूर्वसूचना महाराष्ट्र प्रशासनाला वेळेत दिली जाणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्यीय समन्वय या कोल्हापुरातील बैठकीत यावर निर्णय झाला.
पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी अलमट्टी धरणाच्या विसर्ग व्यवस्थापनावर यामध्ये ठोस चर्चा झाली. कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांतील अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. या बैठकीत अलमट्टीतील पाणीपातळी 15 ऑगस्टपर्यंत 517 ते 517.50 मीटरदरम्यान राखली जाईल असं आश्वासन कर्नाटकच्या प्रशासनाने दिलं आहे.
दरम्यान, अलमट्टीच्या पाण्यावरुन काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांनी राज्य सरकारला सवाल विचारले होते. सांगली-कोल्हापूर मध्ये येणाऱ्या महापुराला महाराष्ट्र सरकार की कर्नाटक सरकार करणीभूत आहे,हे महाराष्ट्र सरकारने ठरवलं पाहिजे, असे म्हणत विशाल पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता.
दोन्ही सरकारची राजकीय भाषण आणि शासकीय म्हणणं वेगळी असतात,आणि महापुराला कर्नाटकचे अलमट्टी धरण कारणीभूत नसेल तर महाराष्ट्र सरकार महापुराला पर्याय व्यवस्था का देत नाही?असा सवाल देखील खासदार विशाल पाटील यांनी उपस्थित करत यावर्षी महापूर आला तर याला जबाबदार कोण ? हे सुद्धा महाराष्ट्र सरकारने सांगावे, असेही विशाल पाटील म्हणाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world