मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचा सर्वात मोठा दावा पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच पहिला आरोपी असून त्यानेच हा कट रचून हत्या घडवल्याचे या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. एकीकडे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढलेल्या असताना दुसरीकडे करूणा मुंडे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
3 मार्च 2025 म्हणजे उद्याच एक राजीनामा होणार असल्याचं करूणा मुंडेंनी म्हटलं आहे. करूणा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून नेमका कुणाचा राजीनामा पडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
दरम्यान करुणा मुंडे यांनी NDTV मराठीशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवारांकडे देण्यात आला असून उद्या २ मार्च रोजी ते जाहीर करतील. उद्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के धनंजय मुंडे राजीनामा देतील, असं करुणा मुंडे यावेळी म्हणाल्या. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यास महायुतीत मोठी उलथापालथ होऊ शकते.
नक्की वाचा - BJP News: भाजपच्या बड्या नेत्याचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, पण शेवटची इच्छा बोलून दाखवली
गेल्या दोन महिन्यांपासून विरोधी पक्षासह भाजपमधील नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान करुणा मुंडे यांनी केलेल्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.