शरद सातपुते, सांगली
सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालयासमोर महिलेवर तिच्या पतीनेचे चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोराने पलायन केले. प्रांजल काळे असे जखमी महिलेचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यापूर्वी संग्राम शिंदे याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु होते. यापूर्वीही संग्रामविरुद्ध तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
प्रांजल आज कॉलेज कॉर्नर येथे आली होती. त्यावेळी संग्रामने तिच्याचवर कॉलेजच्या बाहेरच चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात प्रांजल जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पती संग्राम घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील कारवाई करत आहे.