Know Your Doctor Platform: बनावट डॉक्टरांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय! काय आहे Know Your Doctor प्लॅटफॉर्म?

Maharashtra Assembly Monsoon Session: विधानसभा सदस्य संजय दरेकर, धर्मरावबाबा आत्राम यांनी यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: राज्यातील बनावट डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमार्फत 'नो युवर डॉक्टर' ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानसभा सदस्य संजय दरेकर, धर्मरावबाबा आत्राम यांनी यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता.

IAS Transfer : राज्यातील 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर नवीन नियुक्त्या

काय आहे Know Your Doctor प्लॅटफॉर्म?

‘नो युवर डॉक्टर' या डिजिटल प्रणालीवर रुग्ण क्यूआर कोडद्वारे डॉक्टरांची ओळखपत्रे, डॉक्टरांचे स्पेशलायजेशन, नोंदणी क्रमांक हे तपशील पाहू शकतो. तसेच बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली आहे. बोगस डॉक्टर विरोधात मोहीम सुरू आहे, असेही श्री. मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सभागृहात सांगितले.

दुसरीकडे, राज्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, सन 2021 पासून आतापर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागानेअहिल्यानगर, नाशिक, जळगाव आणि मुंबई या ठिकाणी अनुक्रमे 8, 4, 9 आणि 34 अशा एकूण 55 बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले आहेत. बोगस डॉक्टरांविरुद्ध अधिक कठोर कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. 

(नक्की वाचा - Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांना विधान भवनात असतानाच अश्लील मेसेज, शिवीगाळ अन् थेट धमकी)