
Mumbai News : महाराष्ट्र शासनाने 17 जुलै 2025 रोजी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले आहेत. राज्यातील 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने दिले आहेत. या बदल्यांमध्ये अनेक वरिष्ठ आणि महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?
एम.एम. सूर्यवंशी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेले सूर्यवंशी यांची वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दीपा मुधोळ-मुंडे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावरून त्यांची समाज कल्याण आयुक्त, पुणे येथे बदली झाली आहे.
(नक्की वाचा - Awhad vs Padalkar: विधानभवनात आव्हाड-पडळकरांचे कार्यकर्ते भिडले, जोरदार राडा)
नीलेश गाटने : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गाटने आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार सांभाळतील.
ज्ञानेश्वर खिलारी : ओबीसी, बहुजन कल्याण, पुणेचे संचालक म्हणून कार्यरत असलेले खिलारी यांची अतिरिक्त आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे येथे बदली झाली आहे.
अनिलकुमार पवार : वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त असलेले पवार यांची आता एमएमआरएसआरए, ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सतीशकुमार खडके : महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई येथील (आपत्कालीन व्यवस्थापन) संचालक पदावरून त्यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
भालचंद्र चव्हाण : भूमी सर्वेक्षण विकास एजन्सी, पुणेचे आयुक्त असलेले चव्हाण यांना महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे (आपत्कालीन व्यवस्थापन) संचालक म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
सिद्धार्थ शुक्ला : 02 जुलै 2025 रोजीच्या आदेशात बदल करून, सहाय्यक जिल्हाधिकारी, गोडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर येथून त्यांची आता प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, धारणी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी उपविभाग, अमरावती येथे बदली झाली आहे.
विजयसिंग शंकरराव देशमुख : छत्रपती संभाजीनगर विभागाचे अतिरिक्त आयुक्त-2 म्हणून कार्यरत असलेले देशमुख आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतील.
विजय भाकरे : जिल्हा जात पडताळणी समिती, भंडाराचे अध्यक्ष असलेले भाकरे यांची आता विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूरचे सदस्य सचिव म्हणून बदली झाली आहे.
त्रिगुण कुलकर्णी : मेडिया (MEDA), पुणेचे अतिरिक्त महासंचालक असलेले कुलकर्णी यांची आता यशदा (YASHADA), पुणेचे उपमहासंचालक म्हणून बदली झाली आहे.
गजानन पाटील : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले गजानन पाटील त्यांच्या त्याच पदावर कायम राहतील.
पंकज देवरे : जिल्हा जात पडताळणी समिती, लातूरचे अध्यक्ष असलेले देवरे यांची आता पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महेश पाटील : पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त (महसूल) असलेले पाटील यांची आता आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
मंजिरी मनोळकर : नाशिक विभागाच्या संयुक्त आयुक्त (पुनर्वसन) असलेल्या मनोळकर यांची आता महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आशा अफजल खान पठाण : मुख्यमंत्री सचिवालय, नागपूरच्या संयुक्त सचिव असलेल्या पठाण त्यांच्या त्याच पदावर कायम राहतील.
राजलक्ष्मी शफीक शाह : कोकण विभाग, मुंबईच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त (सामान्य) असलेल्या शाह यांची आता माविम (MAVIM), मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सोनाली मुळे : जिल्हा जात पडताळणी समिती, अमरावतीच्या अध्यक्ष असलेल्या मुळे यांची आता ओबीसी, बहुजन कल्याण, पुणेच्या संचालक म्हणून बदली झाली आहे.
गजेंद्र बावणे : जिल्हा जात पडताळणी समिती, बुलढाणाचे अध्यक्ष असलेले बावणे यांची आता भूमी सर्वेक्षण विकास एजन्सी, पुणेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रतिभा इंगळे : जिल्हा जात पडताळणी समिती, सांगलीच्या अध्यक्ष असलेल्या इंगळे यांची आता अल्पसंख्यांक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world