
विधानभवन परिसरात असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना एका अनोळखी नंबरहून सतत फोन येत होता. पण त्यांनी तो उचलला नाही. त्यानंतर त्याच नंबरहून त्यांना अश्लील मेसेज पाठवण्यात आले. शिवाय शिवीगाळ ही करण्यात आली. तो व्यक्ती ऐवढ्यावर थांबला नाही तर त्यांनी आव्हाड यांना थेट मारण्याचीही धमकी दिली आहे. आव्हाडांनी त्यांना देण्यात आलेल्या धमकीच्या मेसेजचा स्क्रिन शॉर्ट काढून ट्वीट केला आहे. त्यावर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
हा मेसज पाठवण्या मागे बुधवारी झालेला गोपिचंद पडळकर यांच्याबरोबरच्या वादाची किनार होती अशी चर्चा आहे. विधानभवना बाहेर पडताना भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाला होता. त्यावेळचा व्हिडीओ ही व्हायरल झाला होता. त्यात पडळकर शिव्या देताना दिसत होते. गाडी पुढे येण्यावरून हा वाद झाला होता. त्यानंतर त्यावर तिखट प्रतिक्रीया ही उमटल्या पडळकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार टीकाही करण्यात आली.
त्यानंतर आज आव्हाडांना धमक्या देणारे फोन आले. फोन उचलला नाही म्हणून मेसेजवर धमकावण्यात आले. अश्लील शेरेबाजी करण्यात आली. तुला गाडीखालीच टाकायला पाहीजे होता. साहेबांनी तसं केलं नाही असं ही या मेसेजमध्ये म्हटलं आहे. आव्हाडांनी एक स्किन शॉर्ट शेअर करत ट्वीट केलं आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. शिवाय आपल्याला धमकी आल्याचं त्यांनी विधानसभा अध्यक्षानाही सांगितलं. संबंधीतावर कारवाई ची मागणी त्यांनी या निमित्ताने विधानसभेत केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world