Kolhapur News: अंबाबाई मंदिराला सोन्याचा साज! गोव्यातील भक्ताकडून दीड किलो सोन्याचा कळस अर्पण; किंमत तब्बल...

Kolhapur News: कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर आता दीड किलो सोन्याचा भव्य कळस झळकणार आहे. गोव्यातील एका अज्ञात भाविकाने कळस देवीच्या चरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर

Kolhapur News: साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. अंबाबाई मंदिराच्या शिखरावर आता सोन्याचा कळस बसवला जाणार आहे. गोव्यातील एका भाविकाने तब्बल दीड किलो सोन्याचा वापर करून हा भव्य आणि देखणा कळस तयार केला असून, तो देवीच्या चरणी समर्पित केला आहे.

साडेतेरा फुटांचा भव्य कळस

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोव्यातील या दानशूर भक्ताने अत्यंत गुप्तता पाळत ही मोठी देणगी दिली असून त्यांचे नाव अद्याप समोर आलेले नाही. हा सोन्याचा कळस साधारण साडेतेरा फूट उंचीचा आहे. सध्याच्या बाजारभावाचा विचार केला, तर केवळ या कळसाची किंमत तब्बल अडीच कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Vaibhav Sooryavanshi News: "माझ्यासाठी फक्त दोनच संघांनी बोली का लावली?" : वैभव सूर्यवंशी)

अधिक महिन्याचे औचित्य; शुक्रवारी होणार प्रतिष्ठापना

हिंदू धर्मशास्त्रात अधिक महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. याच पवित्र महिन्याचे औचित्य साधून हा सोन्याचा कळस मंदिरावर बसवून आपली मनोकामना आणि श्रद्धा पूर्ण करण्याचा या गोव्यातील भाविकाचा मानस आहे. येत्या शुक्रवारी हा सोन्याचा कळस मुख्य शिखरावर शास्त्रोक्त पद्धतीने आणि धार्मिक विधींनुसार बसवण्याची तयारी सुरू आहे.

(नक्की वाचा-  Hero Flex Fuel Bike: पेट्रोलपेक्षा 20 रुपये फ्लेक्स-फ्यूल बाईक किती परवडेल? जाणून घ्या संपूर्ण बचतीचे गणित)

अनेक भाविकांनी यापूर्वी देवीला मौल्यवान दागिने आणि गुप्त देणग्या दिल्या आहेत. मात्र, गोव्यातील या भाविकाने थेट मंदिराच्या शिखरासाठी दिलेली ही सोन्याच्या कळसाची अभूतपूर्व देणगी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे.

Topics mentioned in this article