VIDEO: बैलगाडा शर्यतीचा जीवघेणा थरार! 4 बाईक चिरडल्या, तरुणांना तुडवलं; कोल्हापुरातील भयंकर व्हिडिओ

Bailgada Sharyat Accident Viral VIDEO: गडहिंग्लज तालुक्यातील औरनाळ येथे बैलगाडी शर्यती दरम्यान बैलांनी दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना घडली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर: 

Kolhapur Bailgada Sharyat Accident VIDEO:  सध्या पश्चिम महाराष्ट्रात गावोगावच्या यात्रांचा उत्सव सुरु आहे. गावातील यात्रेनिमित्त, तमाशा, कुस्त्यांचे फड तसेच बैलगाडा शर्यतीचै मैदान भरवले जात आहे. लाखोंची बक्षीसे असलेल्या या बैलगाडा शर्यतींची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा पाहायला मिळते. अशातच कोल्हापुरच्या गडहिंग्लज तालुक्यात बैलगाडी शर्यतीवेळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. 

Most Expensive Mango: जगातील सर्वात महाग आंबा, सुरक्षेसाठी गार्ड तैनात; 1 किलोच्या किमतीत सुपर बाईक येईल!

बैलगाडा शर्यतीचा जीवघेणा थरार! 

बैलगाडा शर्यत म्हटलं की थरार अन् श्वास रोखून धरणारी स्पर्धा पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींची प्रचंड क्रेझ आहे. धावणाऱ्या बैलांना अडवण्यासाठी गाडा मालक, चालक अक्षरश: जीव धोक्यात घालत असतात. कोल्हापुरच्या गडहिंग्लज तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यतीत असाच जीवघेणा थरार पाहायला मिळाला. गडहिंग्लज तालुक्यातील औरनाळ येथे बैलगाडी शर्यती दरम्यान बैलांनी दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना घडली. 

Advertisement

यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शर्यतीमध्ये उधळलेल्या बैलांच्या पुढे दुचाकी पळवणे तरुणांना चांगलेच महागात पडले. शर्यत सुरु असताना चौखूर उधळलेल्या बैलांच्या मार्गात दोन- ते तीन दुचाकी आल्या. तुफान वेगात असलेल्या बैलांनी या तिन्ही दुचाकींना पाडले. त्यावरील चार ते पाच तरुणांनाही तुडवले. बैलांचा वेग प्रचंड असल्याने त्यांना थांबता आले नाही आणि त्यांनी थेट दुचाकी पाडल्या. 

दुचाकी पाडल्या, तरुणांना तुडवलं

धक्कादायक बाब म्हणजे, एक बैलगाडीने दुचाकीला चिरडल्यानंतर त्यापाठोपाठ दोन ते तीन दुचाकी कोसळल्या तसेच पाठीमागून येणाऱ्या इतर दोन बैल जोड्याही या बैलगाड्यांवर आदळल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही गंभीर जखम झाली नाही, मात्र तरुणांच्या अंगावरुन बैल गेल्याने तसेच दुचाकी कोसळल्याने किरकोळ दुखापत झाली. हा संपूर्ण थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ आता माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्यात. 

संजय राऊतांनी जॅकेटच्या खिशात हात घातला अन् 8 हजार रुपये काढले; वृद्ध शिल्पकाराच्या डोळ्यांत आलं पाणी !