Miyazaki Mango : उन्हाळा सुरू झाला की बाजारात हापूस, पायरी, केशर अशा आंब्यांची रेलचेल सुरू होते. साधारणतः 100 ते 500 रुपये किलोने मिळणारे हे आंबे आपल्याला महाग वाटतात. पण तुम्ही कधी अशा आंब्याबद्दल ऐकले आहे का, ज्याच्या एका किलोच्या किमतीत भारतात एक आलिशान बाईक किंवा सेकंड हँड कार येऊ शकते? आपण जगातील सर्वात महागडा आंबा 'मियाझाकी'बद्दल बोलत आहोत.
'मियाझाकी' ते 'सूर्यपुत्र'
मियाझाकी आंबा प्रामुख्याने जपानमधील मियाझाकी शहरात पिकवला जातो. याला जपानी भाषेत 'ताइयो-नो-तामागो' असे म्हणतात, ज्याचा अर्थ होतो 'सूर्यपुत्र' किंवा 'सूर्याचे अंडे'. गडद लाल आणि जांभळट रंगाचा हा आंबा दिसायला एखाद्या मोठ्या रत्नासारखा वाटतो.
मियाझाकी आंबा इतका महाग का?
अत्यंत कठीण लागवड: या आंब्याच्या प्रत्येक फळाची देखभाल एखाद्या लहान बाळाप्रमाणे केली जाते. झाडावर असताना प्रत्येक आंब्याला एका जाळीत बांधले जाते. जेणेकरून तो जमिनीवर पडून खराब होऊ नये.
नैसर्गिक रंग: या आंब्याला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळेल अशी व्यवस्था केली जाते. सूर्याच्या उष्णतेमुळेच त्याला तो गडद लाल रंग प्राप्त होतो.
क्वालिटी चेक: केवळ 350 ग्रॅमपेक्षा जास्त वजन असलेल्या आणि ज्यामध्ये साखरेचे प्रमाण 15 टक्क्यांहून अधिक आहे, अशाच आंब्यांना 'मियाझाकी' ब्रँडखाली विकले जाते.
(नक्की वाचा- Naresh Arora: राष्ट्रवादीने नरेश अरोरांना का दूर केलं? सूत्रांकडून धक्कादायक माहिती उघड)
सुरक्षेसाठी 'बाऊन्सर' तैनात
मियाझाकी आंब्याची चोरी होण्याचा धोका खूप जास्त असतो. ऐकून आश्चर्य वाटेल, पण मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका शेतकऱ्याने जेव्हा ही झाडे लावली, तेव्हा त्याने त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षारक्षक आणि शिकारी कुत्रे तैनात केले होते. एका आंब्याची किंमत हजारो रुपये असल्याने ही व्हीआयपी सुरक्षा पुरवली जाते. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Dharashiv News: धाराशिवमध्ये 'भोंगा' वाजणार! रोज 2 तास टीव्ही राहणार बंद; जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय)
आंतरराष्ट्रीय बाजारातील दर
आंतरराष्ट्रीय लिलावात या आंब्याच्या एका जोडीची किंमत अनेकदा 2.5 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत जाते. भारतातही काही हौशी शेतकऱ्यांनी याची लागवड करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र जपानसारखे हवामान नसल्यामुळे त्याचे उत्पादन मर्यादित आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world