Kolhapur Agricultural Exhibition : कोल्हापुरात सध्या एक कृषी प्रदर्शन भरलंय. या प्रदर्शनातील रेडा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या रेड्याची किंमत 25 कोटी असून तो 4 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे याच नाव आहे 'आमदार'. त्यामुळे या कृषी प्रदर्शनात हा महाकाय रेडा पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली आहे. पानिपतवरून थेट कोल्हापुरात अवतरलेला हा 'आमदार' म्हणजे जगातील सर्वात मोठा रेडा असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण खरोखरच त्याचं नाव आमदार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून दरवर्षी भीमा कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन विकसित झालेली बी-बियाणे तसेच पाळीव पशुपक्षी हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असतं. यंदा या कृषी प्रदर्शनात हरियाणातील पानिपतमधून नरेंद्र सिंह यांचा 'आमदार' रेडा प्रमुख आकर्षण ठरत आहे. या रेड्याच्या देखरेखीसाठी दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या रेड्याला पाहण्यासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी या कृषी प्रदर्शनाला भेट देत आहेत.
आमदाराची खासियत...
- हा 'आमदार' अवघ्या चार वर्षांचा असून त्याचं वय तब्बल दीड टन इतकं आहे.
- 'आमदारा'ची उंची सहा फूट आणि लांबी 14 फूट इतकी आहे.
- 'आमदारा'ची किंमत तब्बल 25 कोटी इतकी आहे.
- मुऱ्हा जातीच्या या रेड्याला एका महिन्याला एक लाखांचा खुराक लागतो
नक्की वाचा - Sangli News: चक्क बैलांना बॉडीगार्ड! सांगलीच्या पठ्ठ्याची राज्यभर चर्चा, काय आहे प्रकरण?
आमदराची दिनचर्या कशी असते?
- 'आमदारा'ला दोघेजण सांभाळ करण्यासाठी असतात. एक जण त्याच्या खाण्याकडे लक्ष देतो तर दुसरा त्याची देखभाल करतो.
- 'आमदारा'ला दररोज 20 लिटर दूध, 20 किलोफिड आणि 30 किलोंचा चारा आणि भुसा लागतो.
- दिवसभरातून तीन वेळा अंघोळ
- 'आमदार' रेड्यासाठी वातानुकूलिन कक्ष
- सात वेळा वर्ल्ड चॅम्पियन
- 'आमदारा'च्या लहान भावाचं नाव मंत्री असं ठेवण्यात आलं आहे.