Kolhapur Accident: अल्पवयीन मुलाचा प्रताप! मुलींच्या घोळक्यात घातली भरधाव कार, एकीचा मृत्यू, 3 जखमी

कुरुकली येथे बस स्टॉपवर एसटीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात भरधाव वेगाने गाडी घुसून हा भीषण अपघात झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर:

Kolhapur Accident:  बस स्टॅन्डवर एसटीची वाट पाहत उभ्या असलेल्या महाविद्यालयीन मुलींना चारचाकीने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये घडला आहे. राधानगरी कोल्हापूर मार्गावर हा अपघाताचा थरार घडला. या दुर्दैवी घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही गाडी अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह साथीदाराला अटक करण्यात आली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर-राधानगरी मार्गावर भीषण अपघात झाला. कॉलेजमधून घरी जाताना झालेल्या एका भीषण अपघातात एका विद्यार्थींनीचा मृत्यू झाला आहे तर तीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. कुरुकली येथे बस स्टॉपवर एसटीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात भरधाव वेगाने गाडी घुसून हा भीषण अपघात झाला.

Pune News : पुण्यातील गुडलक कॅफे पुन्हा सुरु होणार, वाचा का झाली होती कारवाई?

राधानगरी तालुक्यातील कौलव गावची 18 वर्षांची प्रज्ञा दशरथ कांबळे ही विद्यार्थिनी या अपघातात ठार झाली तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की प्रज्ञा गाडीच्या चाकात अडकून जवळपास शंभर मीटरवर फरफटत गेली. ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.

अपघात झाल्यानंतर शिक्षक आणि काही विद्यार्थ्यांनी वाहनाचा पाठलाग करुन वाहन थांबवलं. त्यानंतर या चारचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलासह साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलांच्या या स्टंटबाजीमुळे निष्पाप मुलीचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. 

Advertisement

सर्पमित्रांसाठी सरकार मोठा निर्णय घेणार, महसूल मंत्री बावनकुळे दिली माहिती

Topics mentioned in this article