Kolhapur Panhala Fort : शिवप्रेमींच्या पाठपुराव्याला यश, पन्हाळा किल्ल्यावर शिवरायांचं स्मारक; सरकारकडून 10 कोटींचा निधी मंजूर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kolhapur Panhala Fort : कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. काल 25 मार्चला विधानभवनात झालेल्या बैठकीत या निधीला मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार आणि शिवप्रेमींनी पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीची मागणी केली होती. अखेर त्यांची मागणी मान्य करीत स्मारकासाठी निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवप्रेमींची इच्छा पूर्ण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पन्हाळा किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वतः महाराजांनी या किल्ल्यावर 133 दिवस वास्तव्य केले होते. तसेच सिद्धी जोहरने टाकलेला पन्हाळ्याचा वेढा असेल, बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेने दिलेले बलिदान असेल किंवा त्यानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य असेल असे ऐतिहासिक महत्त्व या किल्ल्याला आहे.

नक्की वाचा - Pandharpur News: पंढरीच्या विठुरायाची ऑनलाईन पूजा तासाभरात फुल्ल, पहिल्याच दिवशी 'इतक्या' लाखांचे उत्पन्न

मात्र तरीही या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही पुतळा नसल्याने याठिकाणी शिवस्मारक व्हावे अशी मागणी करण्यात येत होती. पन्हाळा किल्ल्यावर शिवछत्रपतींचे स्मारक असावे ही मागणी पहिल्यांदा करण्यात आल्यानंतर त्यावेळेसचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या कामासाठी 5 कोटींचा निधी मंजूर केला होता. पन्हाळा किल्ल्यावरील तळ्याच्या मध्यभागी चौथरा बांधून त्यात हे स्मारक उभारण्यात येणार होते. मात्र काही कारणांमुळे शिवस्मारकाचे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. 
 

Advertisement