Kolhapur News : कोल्हापुरचा सासरा हवा! धोंड्याच्या महिन्यात जावयाला दिलं अस्सं गिफ्ट की सारेच झाले थक्क!

हौसेला मोल नसतं असं म्हणतात. कोल्हापुरातून असाच एक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

Kolhapur News : हौसेला मोल नसतं असं म्हणतात. कोल्हापुरातून असाच एक प्रकार समोर आला आहे. लेकीच्या आनंदासाठी बापाची काहीही करण्याची तयारी असते.  कोल्हापुरातील एका सासऱ्याने आपल्या जावयासाठी चक्क चांदीची चप्पल तयार केल्याचं समोर आलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. अशा स्थितीतही सासऱ्याने त्याच्या हौसेखातर मंदी वगैरे बाजूला सारलं आहे. 

धोंड्याच्या महिन्यात जावयाची मौज...

कोल्हापूर-सांगली मार्गावरील एका हौशी सासऱ्याने आपल्या जावयासाठी तब्बल दीड किलोच्या चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवली आहे. तब्बल ८ दिवस मेहनत घेऊन कारागिरांनी ही चप्पल तयार केली आहे.  कोल्हापूर अन् सांगली जिल्ह्यात वास्तव असणाऱ्या एका श्रीमंत सासऱ्याने ही एका सराफाकडे ही चप्पल बनवायला दिली आहे. या कारागिरानेही चक्क दीड किलोच्या चांदीची हुबेहुब कोल्हापुरी चप्पल बनवून दिली आहे. कोल्हापुरातील या कारागिराने या महिन्यात पिण्याच्या पाण्याचे चार आणि पाच किलो वजनाचे चांदीचे दोन पिंप बनवून दिले आहेत. धोंड्याच्या महिन्यात जावयाला सोनं-चांदीची वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. सोन्या-चांदीचे दर वाढत असले तरी जावयाला भेट देण्यात सासरे काटकसर करीत नसल्याचं दिसून येत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Adhik Maas 2026 : अधिक मासाला धोंड्याचा महिना का म्हणतात? 33 धोंडे वाण देण्याची प्रथा नेमकी काय आहे?

या कोल्हापुरी चपलेची किंमत ४ लाख रुपये आहे. त्याशिवाय या चपलेसाठी २२ हजारांची मजुरी देण्यात आली आहे. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.