जाहिरात

Adhik Maas 2026 : अधिक मासाला धोंड्याचा महिना का म्हणतात? 33 धोंडे वाण देण्याची प्रथा नेमकी काय आहे?

अधिक मासात जावयाला विशेष महत्त्व दिलं जातं. काही ठिकाणी अधिकमासाला गमतीत धोंड्याचा महिना म्हटलं जातं.

Adhik Maas 2026 : अधिक मासाला धोंड्याचा महिना का म्हणतात? 33 धोंडे वाण देण्याची प्रथा नेमकी काय आहे?
AI Image

Adhik Maas 2026 : हिंदू संस्कृतीत अधिक मासाचंही विशेष महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी अधिकमास येतो. वर्षातील हा महिना वाढीव असल्याने याला अधिकमास म्हणतात. महाराष्ट्रात या महिन्याला धोंड्याचा महिला म्हटलं जातं. विशेष म्हणजे या महिन्यात जावयाला विशेष महत्त्व दिलं जातं. काही ठिकाणी अधिकमासाला धोंड्याचा महिनाही म्हटलं जातं. अधिक मास हा भगवान विष्णूचा महिना मानला जातो. भगवान विष्णूंनी या महिन्याचं दायित्व स्वीकारलं आणि स्वत:चं नाव दिलं. त्यामुळे या महिन्यात विष्णूची भक्ती, उपासना केली जाते. लक्ष्मी ही लेकीचं तर जावयाला विष्णूचं रुप मानलं जातं. या महिन्यात सासरच्या मंडळींकडून जावयाचा सन्मान केला जातो. या दिवशी सासरच्यांकडून जावयाला अनारसे आणि धोंड्याचं वाण दिलं जातं.  

अधिक मासाला धोंड्याचा महिना का म्हटलं जातं?

अधिक मास हा अतिरिक्त महिना असतो. वर्षात १२ महिने असतात, मात्र अधिकमासात एक महिना वाढीव असतो.  या महिन्याकडे निष्काम म्हणूनच पाहिलं जातं. य़ा काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाहीत. अशुभ महिना असल्याने याला धोंड्याचा महिना म्हटलं जातं. 

जावई धोंडा सोहळा काय आहे?

अधिक महिना विष्णूचा महिना मानला जातो. जावयाला विष्णूचं रुप मानलं जातं. या महिन्यात जावयाला अनारसे, धोंडेचं वाण दिलं जातं. याशिवाय पुरणपोळी, आमरसाचं जेवण खाऊ घातलं जातं. काही ठिकाणी सोनं किंवा चांदीची भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. त्याशिवाय लेक खूश राहावी म्हणून जावयाचा आदर-सन्मान केला जातो अशीही मान्यता आहे. या महिन्यात जावयाला धोंडे म्हणजेच पुरण भरून कणकेचे उकडून किंवा तळलेले गोड गोळे दिले जातात. हे गोळे गोल किंवा अंडाकृता अगदी दगडासारखे असतात. त्यामुळेही त्याला धोंडे म्हटलं जातं. या पदार्थामुळेही अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हटलं जातं. सौरवर्षात ३६५ दिवस येतात तर चंद्र वर्षात ३५४ दिवस असतात. या वर्षात ११ दिवसांचा फरक असतो. तीन वर्षे झाल्यानंतर ३३ दिवसांचा फरक येतो. त्यामुळे या महिन्यात ३३ आकड्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच या महिन्यात जावयाला ३३ धोंडे किंवा ३३ अनारसे देण्याची प्रथा आहे. 

(वरील लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. NDTV मराठी याबाबत कोणताही दावा करीत नाही. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com