Kolhapur News: विद्यार्थिनींच्या रुममध्ये सापांचा संचार! उंदरांचा ही सुळसुळाट, एका विद्यार्थिनीला तर...

खेळाडू मुलींच्या मूलभूत सोयींकडे शासन पाठ फिरवत आहे असं पाटील म्हणाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशालेची स्थिती अत्यंत दयनीय आहे
  • क्रीडा प्रशालेतील विद्यार्थिनींना उंदरांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे
  • सापांचा मुक्त संचार देखील याशाळेत आहे. त्यामुळे विद्यार्थींनीमध्ये भीती आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
कोल्हापूर:

विशाल पुजारी 

विद्यार्थिनींनी विविधी खेळांत प्राविण्य मिळवावे. त्याना चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी क्रीडा प्रशाला आहेत. त्यातून उद्याचे खेळाडू तयार होत असतात. पण कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशालेची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे समोर आले आहे. या प्रशालेत असलेल्या विद्यार्थिनींच्या वाट्याला भयंकर जगणे आले आहेत. या प्रशालेत उंदरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. हे कमी की काय विद्यार्थीनी ज्या रूम मध्या राहतात तिथे सापांचा ही मुक्त संचार पाहायला मिळत आहे. अशा स्थिती या विद्यार्थिंनीच्या सुरक्षे प्रश्न निर्माण झाला आहे.  

या क्रीडा प्रशालेत अनेक विद्यार्थिनी आहेत. त्या इथं क्रीडा प्रशिक्षणासोबत राहतात. गेल्या आठवडाभरात सहा विद्यार्थिनींना इथं उंदरांनी चावा घेतला आहे. यात एकाच रात्री चार विद्यार्थिनींना उंदरांनी कुरतडले आहे. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिवाय ही बाब समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. उदंरामुळे विद्यार्थीनी चिंतेत आहे. तक्रार करून ही त्यावर ठोस उपाय होत नसल्याचा आरोप होत आहे. ही अजून किती दिवस चालणार अशी विचारण होत आहे.   

Advertisement

नक्की वाचा - Ashadhi Wari: तुकोबारायांच्या पालखीला का घातलं जातं मेंढ्यांचं रिंगण? काय आहे त्या मागची परंपरा अन् मान्यता

संस्कृती पारळे या विद्यार्थिनीला वर्षात तीन वेळा उंदीर चावला आहे. त्यामुळे तिला वारंवार रेबीजची इंजेक्शने घ्यावी लागली आहेत. हे कमी की काय म्हणून उंदरांच्या मागोमाग आता सापांचा वावरही थेट बेडपर्यंत झाला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थिनींमध्ये भीतीचे सावट पसरले  आहे. त्यांची रात्रीची झोप उडाली आहे. ही क्रीडा प्रशाला 40 वर्षे जुन्या इमारत आहे. त्याची दुरवस्था झाली आहे. त्यातच संडास-बाथरूमची स्थिती अत्यंत दयनीय आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांनी केला आहे.

नक्की वाचा - Social Media: सोशल मीडियावर रात्रीचा 'कर्फ्यू'! रात्री 12 नंतर सोशल मीडियावर बंदी, सरकारने बनवला कडक नियम

खेळाडू मुलींच्या मूलभूत सोयींकडे शासन पाठ फिरवत आहे असं पाटील म्हणाले आहे. शिवाय याबाबत पालकांनी ही संताप व्यक्त केला आहे. भविष्यातील खेळाडूंच्या नशिबी हे काय आले आहे असा प्रश्नही त्यांनी केला आहे. शाळा प्रशासनाने केवळ उंदीर पकडण्याचे सापळे देऊन आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप आहे. ऐवढं केलं म्हणजे झालं का असा ही प्रश्न पालक उपस्थित करत आहे.  त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.