जाहिरात

Social Media: सोशल मीडियावर रात्रीचा 'कर्फ्यू'! रात्री 12 नंतर सोशल मीडियावर बंदी, सरकारने बनवला कडक नियम

सर्व काही नियोजित वेळेनुसार झाल्यास Spring 2027 पासून हे नियम लागू होणार आहेत.

Social Media: सोशल मीडियावर रात्रीचा 'कर्फ्यू'! रात्री 12 नंतर सोशल मीडियावर बंदी, सरकारने बनवला कडक नियम
  • ब्रिटन सरकारने मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सोशल मीडियावर कर्फ्यू लागू केलाय
  • रात्रीच्या काळात सोशल मीडिया ॲप्सचा वापर डीफॉल्ट मोडमध्ये मर्यादित केला जाईल
  • व्हिडिओ ऑटो-प्ले आणि पर्सनलाइज्ड फीडसारख्या तरुणांना तासंतास खिळवून ठेवणाऱ्या फीचर्सवर बंदी

अनेक मुलं सध्या सोळ मीडियाच्या आहारी गेली आहे. तासंन तास ती सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेली असतात. त्यावर नियंत्रम मिळवण्यासाठी ब्रिटन सरकारने एक महत्वाचा आणि तेवढाच क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. या निर्णया नुसार  ब्रिटन सरकारने किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी पाऊल उचलले आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुणांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी सरकार 16 आणि 17 वर्षांच्या युजर्ससाठी एक नियम आणत आहे. या नियमानुसार रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सोशल मीडिया वापरावर 'ओव्हरनाईट कर्फ्यू' लागू करणार आहे. 

या काळात सोशल मीडिया ॲप्सचा वापर मर्यादित केला जाईल असं सरकारने स्पष्ट केलं आहे. हा नियम डीफॉल्ट स्वरूपात लागू असणार आहे. मात्र युजर्सना त्यांच्या गरजेनुसार सेटिंग्ज बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. तरुणांना तासनतास स्क्रीनवर खिळवून ठेवणाऱ्या फीचर्सवरही सरकारने बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये व्हिडिओ 'ऑटो-प्ले' आणि 'पर्सनलाइज्ड फीड' यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. हे फीचर्स डीफॉल्ट मोडमध्ये बंद ठेवले जातील. युजर्सना सतत स्क्रोलिंग करण्यापासून रोखणे हा या मागचा महत्वाचा उद्देश आहे. 

नक्की वाचा - Airport Divorce: एयरपोर्टवर पोहोचताच काही कपल्स वेगळे का होतात? VIRAL TREND मागील जाणून घ्या सत्य

त्यांचा अमूल्य वेळ वाचवणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचं सरकारने स्पष्ट केले आहे. जवळपास 300 पेक्षा जास्त किशोरवयीन मुले आणि त्यांच्या पालकांसोबत केलेल्या पायलट प्रोजेक्टच्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटश सरकारने याची आधी ट्रायल घेतली. त्यानंतर आता तो लागू केला जाणार आहे. ब्रिटनच्या तंत्रज्ञान सचिव लिझ केंडल (Liz Kendall) यांनी स्पष्ट केले की, मुलांसाठी 'एआय चॅटबॉट्स'च्या वापरावरही लवकरच नवीन नियम आणले जातील. 

नक्की वाचा - Airtel ग्राहकांना बसू शकतो मोठा झटका! आपोआप कापले जाऊ शकतात पैसे? काय आहे कारण?

शिवाय धोकादायक एआय बॉट्सवर बंदी घालण्याचा अधिकार सरकारकडे असेल. तसेच, शाळांमध्ये डिजिटल सुरक्षा आणि एआय साक्षरता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत असं ही त्यांनी सांगितलं. येत्या सप्टेंबर महिन्यापासून 'रिलेशनशिप्स, सेक्स अँड हेल्थ एज्युकेशन' (RSHE) च्या अभ्यासक्रमात एआय चॅटबॉट्स, फेक न्यूज, चुकीची माहिती आणि हिंसक कंटेंट ओळखणे यांसारख्या विषयांचा समावेश केला जाईल. या नियमांचा पहिला मसुदा या वर्षाच्या अखेरीस संसदेत सादर केला जाणार आहे.  सर्व काही नियोजित वेळेनुसार झाल्यास Spring 2027 पासून हे नियम लागू होणार आहेत.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com