Kolhapur News: संत बाळूमामा ट्रस्टमध्ये 60 कोटींचा घोटाळा; तत्कालीन धर्मादाय निरीक्षकासह कंत्राटदारावर गुन्हा

Kolhapur News: संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये सुमारे ६० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तत्कालीन निरीक्षण अधिकारी आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर

Kolhapur News: महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवस्थानच्या कारभारात तब्बल 60 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रशासनाने मोठी पावले उचलत तत्कालीन निरीक्षण अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारावर रीतसर गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता, तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यावर आधीच निलंबनाची धडक कारवाई करण्यात आली आहे.

जमिन खरेदी आणि धनादेशात मोठा गैरव्यवहार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या देवस्थान ट्रस्टमध्ये गेल्या काही काळापासून आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता सुरू होती. देवस्थानच्या निधीतून तब्बल 55 लाख रुपयांचा धनादेश कोणत्याही कायदेशीर मंजुरीशिवाय किंवा नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या कंत्राटदाराला देण्यात आला होता. तसेच देवस्थान ट्रस्टसाठी करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या जमिनींच्या खरेदी व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा अपहार आणि मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Navi Mumbai Crime: शिंदेसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक, भंगारवाल्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप)

या दोन्ही प्रकरणांमध्ये मुख्य संशयित असलेल्या तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर, त्यांच्यावर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  Salman Khan Health: सलमान खानला झालंय तरी काय? 5 फोटो शेअर करत चिंतेत असलेल्या फॅन्सना दिलं उत्तर)

लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या; पोलीस तपास सुरू

संत बाळूमामा यांच्या नावावर भाविकांनी विश्वासाने अर्पण केलेल्या पैशांचा आणि देवस्थानच्या मालमत्तेचा अशा प्रकारे गैरवापर झाल्याचे समोर आल्याने संपूर्ण राज्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 60 कोटींसारखी प्रचंड मोठी रक्कम घोटाळ्यात अडकल्याचा आरोप असल्याने, पोलीस आणि धर्मादाय आयुक्तालय या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, कंत्राटदाराला झुकते माप का देण्यात आले आणि जमिनींचे व्यवहार कोणाच्या फायद्यासाठी करण्यात आले, याचा कसून शोध पोलिसांमार्फत घेतला जात आहे.
 


Topics mentioned in this article