Kolhapur News: पंचगंगेच्या घाटावर अघोरी प्रकार! भूत उतरवण्यासाठी मांत्रिकाकडून मंत्रोपचार, कोल्हापुरात खळबळ

दहा ते बारा जण मिळून एका महिलेचं भूत काढत असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली. घाटावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे भीतीचं वातावरण आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर: कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटावर एक अंधश्रद्धेशी निगडित एक पूजा  सुरु असल्याची घटना समोर आली. एका महिलेला भूत झपाटला असल्याच्या तंत्र मंत्राच्या साह्याने पूजा  सुरू होती. घाटावर फिरायला आलेला काही नागरिकांनी याची व्हिडिओ बनवली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. दहा ते बारा जण मिळून एका महिलेचं भूत काढत असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली. घाटावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे भीतीचं वातावरण आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंचगंगा नदी घाटावर दररोज संध्याकाळी लोक फिरायला येत असतात. काही लोकांच्या जेवणावळी या घाटावर होत असतात. तर काही वेळा परडी सोडण्याचे प्रकार देखील घाटावर होतात. अशा विविध पूजा विधीचे प्रकार घाटावर असतात. आणि यातच सध्या घडलेली ही धक्कादायक घटना. एका महिलेचं भूत काढताना काही लोक जमलेले होते.

एका महिलेला झपाटलेल असल्याच्या संशयावरून एका मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार सुरू होता. सहा ते सात पुरुष तीन ते चार महिला या व्हिडिओमध्ये दिसून येतायत. एका व्यक्तीसमोर समोर या महिलेच भूत काढण्याच प्रकार सुरु आहे. हा सगळा प्रकार काही नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. आणि त्यानंतरच ही घटना उघडकीस आली. रात्री 10 च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील लोक भीतीच्या छायेखाली आले.. मात्र तरी तेथील कोल्हापूरच्या  सुजाण नागरिकांनी हा प्रकार हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. 

( नक्की वाचा : Raja Raghuvanshi Death : सोनमला फसवलं जातंय का? पोलिसांना शोधायची आहेत या प्रश्नांची उत्तरे )

दरम्यान, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही. मात्र गेल्या काही दिवसात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. या भोंदूगिरीला कोल्हापुरातील अनेक सर्वसामान्य नागरिक बळी पडत पडतायत. पोलीस प्रशासनाकडून या व्हिडिओची खातरजमा सुरू आहे. मात्र असे प्रकार बंद व्हाव्या. अशा सर्वसामान्यांच्या भावना आहेत.

Advertisement