Kolhapur News : शनिवार-रविवारी सुट्टीच्या दिवसात मुंबई-पुण्यातून कित्येक कुटुंब कोल्हापुरला अंबाबाईच्या दर्शनासाठी जात असतात. या सुट्टीलाही तुम्ही कोल्हापुरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी जाण्याचा प्लान करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तब्बल चार दिवस अंबाबाई देवीचं मंदिर बंद असणार आहे. त्यामुळे या दिवसात भाविकांना देवीचं दर्शन घेता येणार नाही.
कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं चार दिवस दर्शन बंद असणार आहे. संवर्धन प्रक्रियेदरम्यान मुख्य गाभाऱ्याचं काम उद्या १४ मार्चपासून सुरु होणार असल्याने दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
नक्की वाचा - Satara News: सहावीच्या विद्यार्थिनींनी दहावीचे पेपर तपासले? CCTV समोर, साताऱ्यात खळबळ
देवीचं दर्शन चार दिवस बंद
कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं दर्शन चार दिवस बंद राहणार आहे. १४ ते १७ मार्च दरम्यान गाभारा बंद असणार आहे. संवर्धन प्रक्रियेदरम्यान मुख्य गाभाऱ्याचंही काम केलं जाणार आहे. त्यामुळे गाभारा चार दिवस बंद राहणार आहे. या काळात भाविकांना देवीच्या उत्सव मूर्ती आणि तत्व कलशाचे दर्शन घेता येणार आहे. तसेच मंदिरातील नित्य धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. गाभाऱ्याचं संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर १८ मार्चपासून देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत होणार आहे.