जाहिरात

सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा हायवे वर वाहतूक कोंडी, चाकरमानी नेमके कुठे अडकले?

मुंबई गोवा महामार्गावर पनवेल पासून महाडपर्यंत अनेक ठिकाणी प्रवासात विघ्न येत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहेत.

सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा हायवे वर वाहतूक कोंडी, चाकरमानी नेमके कुठे अडकले?
रायगड:

गणपतीसाठी चाकरमानी कोकणात रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी दिसत आहे. आज शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर ही वाहतूक कोंडी दिसत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी गाड्यांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. त्यात रस्त्याची वाईट अवस्था असल्याने आणखी मनस्ताप चाकरमान्यांना सहन करावा लागत आहे. पनवेल पासून महाडपर्यंत अनेक ठिकाणी प्रवासात विघ्न येत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई- गोवा हायवेवर खारपाडा, वडखळ, गडब, नागोठणे, सुकेळी खिंड,  पुई, कोलाड नाका ते कोलाड रेल्वे स्टेशन या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला भेटत आहेत.
सुकेळी खिंड उतरल्यावर खांब गाव ते कोलाड रेल्वे स्टेशनपर्यंत पहाटे पासून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. खांब ते कोलाड स्टेशन 5-6 किलोमीटर परिसरात मोठया प्रमाणात प्रवासी छोटी वाहने, ST बसेस, दुचाकीस्वार अडकले आहेत. मुंगीच्या गतीने त्यांना पुढे सरकावं लागत आहे. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंचा नवा डाव, मुंबईत 22 जागांवर लढण्याची तयारी... वाचा संभाव्य यादी

सुकेळी खिंड ते कोलाड स्टेशनपर्यंत वाहतूक पोलीस, रायगड पोलीस व स्वयंमसेवकांची टीम रस्त्यावर वाहतुक सुरळीत करताना दिसत आहे. शनिवारी गणपतीचे आगमन होणार आहे. त्यामुळे बरेचसे चाकरमानी आजच गावाकडे निघाले आहेत. गुरूवाच्या तुलनेत शुक्रवारी जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी दिसत आहे. अनेकांनी रेल्वेने जाणे पसंत केले आहे. तर काही जण मुंबई पुणे हायवेने रवाना झाले आहेत. पण मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई गोवा महामार्गाचाच वापर करताना दिसत आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - भाजपनंतर राष्ट्रवादीतही खडसेंना नो एन्ट्री? रोहिणी खडसेंचाही पत्ता कट होणार?

यावाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून अनेक जण मुंबई पुणे एक्सप्रेस वे ने खोपोली मार्गे पाली माणगाव गाठत आहेत. हा एकेरी रस्ता असला तरी तुलनेने कमी रहदारी आहे. त्यामुळे माणगावपर्यंतचा प्रवास सुरळीत आणि तेवढाच वेगवान होत आहे. मात्र पाली आणि माणगाव इथे सर्व वाहने एकत्र येत असल्याने इथंही वाहतूक कोंडी दिसून येत आहे. माणगावची बाजारपेठ असल्याने इथं हायवे वरून येणारी वाहानं आणि स्थानिक वाहनं यामुळे प्रचंड कोंडी होत आहे. त्यामुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी तासन तास वेळ लागत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक वाहतूक पोलीस काम करत आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com