Satara News : महाबळेश्वरपासून अवघे 55 किलोमीटर; यंदाच्या विकेंडला सह्याद्रीच्या कुशीत घ्या अभूतपूर्व अनुभव

महाबळेश्वरहून ५५ किलोमीटर अंतरावर पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने एका महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Satara News : सातारा...सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील निसर्गरम्य ठिकाण. साताऱ्यातील महाबळेश्वर असो वा पाचगणी. आठवड्याच्या सुट्टीला मुंबई-पुणेकरांची पावलं तिथं आपोआप वळतात. अशा साताऱ्याला 'चार चांद' लावण्यासाठी प्रशासनाकडून एका उपक्रम राबवला जात आहे. महाबळेश्वरहून ५५ किलोमीटर अंतरावर पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना-दौलत डोंगरी पर्यटन महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आलं आहे. २ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत साताऱ्यातील दौलतनगर येथे हा महोत्सव पार पडणार आहे.

महोत्सवात काय असेल खास? 

महोत्सवादरम्यान पर्यटकांसाठी पॅराग्लायडिंग, बोटींग, खाद्य महोत्सव, शस्त्र प्रदर्शन तसेच कृषी, पशु-पक्षी व महिला बचत गटांचे प्रदर्शन, फनफेअर आदी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नामांकित शाहीरांकडून पोवाडा सादरीकरण, भजनी मंडळ स्पर्धा, ब्रास बँड पथक वादन, लेझर शो, ड्रोन शो, लावणी महोत्सव तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.

Advertisement

नक्की वाचा - Pune News : आईशप्पथ! पुणे आहे की शिमला? Video पाहून नागरिक हैराण!

या महोत्सवात कृषी-पर्यटनाचे अनुभवही दिले जातील, जिथे पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, तसेच योग, ध्यान आणि आयुर्वेदिक उपचार यांसारख्या आरोग्य पर्यटन उपक्रमांचाही समावेश असेल. राज्याचे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
 

Topics mentioned in this article