माणुसकीचा मृत्यू; अर्ध शरीर गाडीखाली, महिलेच्या मृतदेहाला ओरबाडत राहिला, संतापजनक Video

रस्त्यावर अनेक गाड्यांचा चेंदामेंदा झाला होता... तर ठिकठिकाणी लोक वेदनांनी विव्हळत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

कुर्ला बेस्ट बस अपघातात सात जणांचा हकनाक बळी गेला तर तब्बल 50 जणं जखमी झाले आहेत. चालकाला ई-बस चालविण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे एक्सिलेटरवरील प्रेशर वाढल्याने बस वेगाने पुढे गेली. चालकाला बस नियंत्रणात आणता आली नाही आणि रस्त्यावरील पादचाऱ्यांना उडवित बस रस्त्याशेजारील इमारतीच्या कुंपणाच्या भिंतीला धडकली. 

नक्की वाचा - कुर्ला अपघातानंतर चालक संजय मोरेने काय केलं; बसमधील धक्कादायक CCTV फुटेज आले समोर 

यानंतर परिसरात गोंधळ सुरू झाला. लोकांचा आरडाओरडा सुरू होता. आजूबाजूचे लोक देवाच्या धावा करीत होते. रस्त्यावर अनेक गाड्यांचा चेंदामेंदा झाला होता.. तर ठिकठिकाणी लोक वेदनांनी विव्हळत होते. कोणाला काही कळायच्या आत सर्व उद्ध्वस्त झालं होतं. नोकरीसाठी निघालेल्या फातिमा कनिस अन्सारी एका कारच्या चाकाखाली आली होती. तिचं अर्ध शरीर गाडीच्या खाली गेलं होतं. तिचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र याचवेळी त्या मृतदेहाच्या हातातून सोन्याच्या बांगड्या चोरण्याचं काम सुरू होतं. बांगड्या घट्ट असल्याने सहज निघत नव्हत्या.

मात्र तरुणाने प्रयत्न सोडला नाही. तिला बाहेर काढण्यापेक्षा तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरणं त्याला जास्त महत्त्वाचं वाटत होतं. तिचा मोबाइलही कुणीतरी घेतला होता. तर स्वत:ला माणूस म्हणवणारा एक तरुण तिच्या हातातल्या सोन्याच्या बांगल्या खेचून काढत होता. तर दुसऱ्या हातात त्याने फातिमाची बॅग घट्ट पकडली होती. तरुणाने हेल्मेट घातलं होतं, त्यामुळे तो कोण आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

Advertisement

कुर्ला बस अपघातात मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार घडला. लोकांचे जीव जात असताना त्यांचा वाचवण्यापेक्षा लोक पीडितांनाच ओरबारडताना चित्र संतापजनक आहे.