तब्बल 50 जणांना जखमी करीत सात जणांचा जीव घेणाऱ्या कुर्ला बेस्ट बसच्या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. या बेस्ट बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, तर चालकही दारूच्या नशेत नसताना अपघात कसा झाला याबाबत मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेचे रस्त्याजवळील दुकानातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
नक्की वाचा - बसमध्ये बिघाड नाही, चालकानं मद्यपान केलं नव्हतं; कुर्ला डेपोजवळच सुरू झालं होतं अपघाताचं सत्र?
मात्र ही घटना घडत असताना बसमध्ये नेमकं काय सुरू होतं, यावेळी बसमध्ये किती प्रवासी होते, याबाबत नेमकी माहिती समोर आली नव्हती. अंगावर काटा आणणारे बसमधील व्हिडिओ समोर आले आहेत.
बसमधील सीसीटीव्हीमध्ये बस कुर्ला स्थानक डेपोमधून सुटल्यानंतर कंडक्टर तिकीट काढताना दिसत आहे. बसमध्ये गर्दी असून अनेक प्रवासी उभे असल्याचेही दिसत आहे. मात्र अचानक बसचा स्पीड वाढतो आणि बसमध्ये खळबळ उडते. प्रवाशांना काय करावं सूचत नाही. काही क्षणात बस थांबते. अन् प्रवासी फुटलेल्या काचांमधून बसमधून खाली उड्या मारतात. शेवटी या अपघाताचा आरोपी चालक संजय मोरे जागेवरुन उठतो. यावेळी त्याच्या हातात दोन बॅगा असल्याचं दिसत आहे. दोन्ही बॅगा घेऊन तो काचा फुटलेल्या खिडकीतून उडी मारत असल्याचं दिसून येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world